आनंदाची बातमी... हजारो नागरिकांचा जीव घेणारा काेराेनाचा ‘डेल्टा व्हेरिएंट’ राज्यातून नामशेष !

    दिनांक : 24-Aug-2022
Total Views |
पुणे : महाराष्ट्रात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. हजारो महाराष्ट्रात जिनाेम सिक्वेन्सिंग करणाऱ्या प्रयाेगशाळा ‘इंडियन सार्स काेविड जिनाेमिक काॅन्साेर्टियम’ (इन्साकाॅग) चे समन्वयक तथा बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयाेगशाळा विभागाचे प्रमुख डाॅ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली. 
 
 

covid
 
 
 
फेब्रुवारी ते जून २०२१ या पाच महिन्यांदरम्यान दुसऱ्या लाटेला कारणीभूत ठरलेल्या काेराेना मृतांच्या या कटू आठवणी मागे ठेवणारा हा डेल्टा व्हेरिएंट व लाखाे नागरिकांना बाधित करून जवळपास ९० हजार नागरिकांचा जीव घेणारा काेराेनाचा ‘डेल्टा व्हेरिएंट’ आता राज्यातून नामशेष झाला आहे. राज्यातील काही नमुन्यांच्या जिनाेम सिक्वेन्सिंग (जनुकीय क्रमनिर्धारण) मधून ही माहिती समाेर आली आहे. यातून राज्याला काेराेनाबाबत एक प्रकारे दिलासाच मिळाला आहे.
 
राज्यात काेराेनाचा पहिला रुग्ण पुण्यात ९ मार्च २०२० राेजी सापडला. ताे काेराेनाचा पहिला मूळ विषाणू हाेता. या विषाणूने आतापर्यंत विविध रूपे बदलली. त्यालाच काेराेनाचा उपविषाणू (सबव्हेरिएंट) असे म्हणतात. त्यापैकीच एक ‘डेल्टा’चा शिरकाव राज्यात नाेव्हेंबर २०२० पासून व्हायला सुरुवात झाली हाेती. मात्र, त्याचा खरा प्रादुर्भाव हा फेब्रुवारी २०२१ पासून पाहायला मिळाला.
 
जिनाेम सिक्वेन्सिंग  काय आहे ?
 
- काेराेनासह प्रत्येक विषाणूची जनुकीय संरचना वेगळी असते. त्याची जनुकीय संरचना कशी आहे याचा शोध घेण्याची प्रक्रिया म्हणजे 'जिनोम सिक्वेन्सिंग' हाेय.
 
- काेराेना हा सारखे नवीन रूप बदलताे. नवीन व्हेरिएंट त्याच्या रुग्ण बाधित हाेण्याचा वेग, लागण झाल्यावर मृत्यूचा दर किती वाढेल की ताे साैम्य राहील याची माहिती आधीच या जिनाेम सिक्वेन्सिंगद्वारे मिळू शकते.
 
- राज्यात गेल्या दाेन वर्षांपासून प्रत्येक जिल्ह्यात आढळून येणाऱ्या काेराेनाच्या एकूण रुग्णांपैकी ५ टक्के नमुन्यांचे जिनाेम सिक्वेन्सिंग करण्यात येते.
 
देशात प्रथमच नाेव्हेंबर २०२० मध्ये यांनी लावला डेल्टा व्हेरिएंटचा शाेध
 
पुण्यातील बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयाेगशाळेने देशात प्रथमच नाेव्हेंबर २०२० मध्ये डेल्टा व्हेरिएंटचा शाेध लावला हाेता. त्याचा अहवाल राज्य शासनाद्वारे केंद्राला कळवला हाेता. त्यावेळी केंद्राच्या नामांकित प्रयाेगशाळांनादेखील त्याच्या विनाशक शक्तीचा अंदाज आला नव्हता. म्हणून तयारी कमी पडली अन् दुसरी लाट अधिक संहारक ठरली.
 
 सिक्वेन्सिंग होण्याचे ठिकाण
 
- बीजे वैद्यकीय महाविद्यालय, पुणे
- राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थान (एनआयव्ही), पुणे
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲंड रिसर्च (आयसर), पुणे
- नॅशनल सेंटर फाॅर सेल्स सायन्स (एनसीसीएल), पुणे
- कस्तुरबा प्रयाेगशाळा, मुंबई
- सीएसआयआर इन्स्टिट्यूट- निरी, नागपूर
 
‘डेल्टा’च्या प्रादुर्भावाने घडल्या या घटना -
 
- डेल्टाच्या काळात राज्यात ९० हजार मृत्यू.
- प्रतिदिन ५० ते ६० हजार नवे बाधित.
- प्रतिदिन ३०० ते ४०० च्या दरम्यान मृत्यू.
- याच काळात भासली व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडची प्रचंड कमतरता.
- अनेक रुग्णांना व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे ओढवला मृत्यू.
 
''राज्यातून डेल्टा व्हेरिएंट आता हद्दपार झाला आहे. त्याची जागा ओमायक्राॅनच्या बीए.२.७५ या साैम्य व्हेरिएंटने घेतली असून, आता जवळपास सर्वच रुग्णांमध्ये ताे आढळत आहे. तसेच बीए. ५ हा विषाणू १० टक्क्यांच्या आसपास आहे. - डाॅ. राजेश कार्यकर्ते, समन्वयक, इन्साकाॅग''