मुख्यमंत्र्यांच्या एका फोनने बिहारमधील पुणेकराला उपचारासाठी मिळाली लाखोंची मदत

    दिनांक : 17-Jul-2022
Total Views |
पुणे : . पाटना येथे राहणाऱ्या पुण्यातील अमोल जाधव यांच्या घरी स्फोट झाला होता.त्यात कुटुंबातील चारही सदस्य गंभीर जखमी झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका फोनमुळे पुणेकराला मदत मिळाली आहे.
 
 

shinde
 
 
नेमकं काय घडलं?
 
बिहारमधील पाटना शहरात पुण्यातील अमोल जाधव यांचं कुटुंब राहत होतं. त्याच्या घरात स्फोट झाला होताअमोल जाधव यांच्या पत्नी आणि दोन्ही मुलींना गंभीर दुखापत झाली होती. त्या तुलनेत अमोल जाधव यांना कमी दुखापत झाली होती. त्या चौघांनाही पुण्यात उपचार घ्यायचे होते. त्यामुळे पत्नीला त्यांनी एअर अंबुलन्समध्ये पुण्यातील सुर्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र एका रुग्णाला एअर अंबुलन्समध्ये पुण्यात आणण्यासाठी 10 लाख रुपयांचा खर्च लागतो. त्यात दोन्ही मुलांना एअऱ अंबुलन्समध्ये पुण्यात आणण्यासाठी खर्च परवडणारा नव्हता. त्यावेळी त्यांचा निरोप श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थाना संस्थेचे कार्यकर्ते अविनाश मरकळे यांना मिळाला. अविनाश यांनी एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी संपर्क केला. त्यांनी लगेच प्रतिसाद दिला. मुख्यमंत्र्यांच्या मदतीने शिवसेना वैद्यकिय मदत कार्यलयातून अविनाश मरकळे यांना फोन आला. त्यांना परिस्थिती सांगितली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मोफत या दोन्ही रुग्णांना पुण्यात येण्यासाठी मदत केली.
 
"आमच्याकडे शब्द नाहीत, माणसांत देव असतो हे आज समजले. नाव, गाव, पत्ता, ओळख, शिफारस काहीही माहिती नसताना मुख्यमंत्र्यांनी आम्हाला मदत केली. मदतीसाठी आम्ही खूप लोकांना बोललो पण कोणीही मदत केली नाही. . आमच्या मूळ गावी हे समजल्याने सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. बिहारच्या नागरिकांनी देखील मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. गावी गेल्यावर गावात साहेबांनी केलेल्या मदतीचे बोर्ड लावणार आहोत", असं अमोल जाधव यांनी सांगितले