नामांतराच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी बोलावली मंत्रिमंडळाची तातडीची बैठक

    दिनांक : 16-Jul-2022
Total Views |
मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आले, तेव्हा त्यांनी घाईघाईने 200-300 निर्णय घेतले. मात्र, ही बैठक अनधिकृत होती. सरकार अल्पमतात असताना अशी कॅबिनेटची बैठक घेऊ शकत नाही. या बैठकीत घेतलेले निर्णय बेकायदेशीर आहेत. त्यामुळे उद्या शनिवारी मंत्रिमंडळ बैठक घेऊन आम्ही काही निर्णयांवर शिक्कामोर्तब करणार आहोत. त्यात औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराचा पुन्हा अधिकृतपणे मंजुरी देऊ, असे सूतोवाच मुख्यमंत्री Eknath Shinde एकनाथ शिंदे केले.
 
 
 

shinde
 
 
 
शिंदे समर्थक आमदार अब्दुल सत्तारांनी मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित केलेल्या सत्कार समारंभात Eknath Shinde मुख्यमंत्री बोलत होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठक घेऊन औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर तसेच उस्मानाबादचे नाव बदलून धाराशीव करण्यात आले होते. नवी मुंबईच्या विमानतळाला दि. बा. पाटील यांच्या नावालाही हिरवा कंदील देण्यात आला होता. सोबतच, 300 जीआर काढण्यात आले होते. मात्र, हे जीआर अनधिकृत असून उद्या याबाबत बैठक घेऊन या निर्णयांवर पुर्नविचार केला जाणार आहे.