तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातील 11 पोलिसांना केंद्रीय गृहमंत्री पदक

    दिनांक : 13-Aug-2022
Total Views |
देशभरातील 151 पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री पदकानं करणार सन्मानित !
मुंबई :मागील दोन वर्षे कोरोनामुळे निर्बंधाखाली पार पडल्यानंतर यंदा स्वांतत्र्य दिनादिवशी विविध पुरस्कारांची वाटप केली जाणार आहे. भारताचा 75 वा स्वांतत्र्य दिवस यंदा साजरा केला जाणार आहे. दरम्यान वर्ष 2022 साठी केंद्रीय गृहमंत्री पदकांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी विविध गुन्ह्यांच्या तपासांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील 11 पोलिसांना पदक जाहीर झालं आहे.
 

 राज्य, तपास, उत्कृष्ट कामगिरी, 11 पोलिस,  केंद्रीय गृहमंत्री पदक,  सन्मानित , State, Investigation, Outstanding Performance, 11 Police, Union Home Minister Medal, Awardedolice 
 
 
 
 
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 2022 वर्षासाठी 'केंद्रीय गृहमंत्री पदक उत्कृष्टता तपास' पदक शनिवारी जाहीर करण्यात आले. यावेळी देशभरातील 151 पोलिसांना पदक मिळणार असून यामध्ये 11 राज्यातील पोलिसांचा समावेश आहे.
केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झालेले पोलीस अधिकारी पुढीलप्रमाणे-
कृष्णकांत उपाध्याय, उपपोलीस आयुक्त
प्रमोद भास्करराव तोरडमल, निरीक्षक
मनोज मोहन पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक
दिलीप शिशुपाल पवार, निरीक्षक
अशोक तानाजी विरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ)
अजित भागवत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ)
राणी तुकाराम काळे, सहाय्यक निरीक्षक
दिपशिखा दिपक वारे, निरीक्षक
सुरेशकुमार नानासाहेब राऊत, निरीक्षक
जितेंद्र बोडप्पा वनकोटी, निरीक्षक
समीर सुरेश अहिरराव, निरीक्षक
2018 पासून दिला जातो पुरस्कार
विविध गुन्ह्यांच्या तपासातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी आणि तपासातील अशा उत्कृष्टतेचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या पुरस्काराची सुरूवात 2018 वर्षीपासून करण्यात आली आहे. यंदा महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. यासह केंद्रीय अन्वेषण ब्यूरोचे (सीबीआय)15, मध्य प्रदेशमधून 10 पोलीस अधिकारी-कर्मचारी, उत्तर प्रदेशातून 10 पोलीस अधिकारी-कर्मचारी, केरळमधून 8 पोलीस, राजस्थानमधून 8 पोलीस, पश्चिम बंगालमधून 8 आणि उर्वरित राज्यांमधून तसेच केंद्रशासीत प्रदेशाताल पोलिसांचाही समावेश आहे. 28 महिला पोलिस अधिकाऱ्यांचा देखील यात समावेश आहे.
गेल्या वर्षी 152 पोलीस कर्मचार्‍यांचा गौरव
गेल्या वर्षी म्हणजेच 2021 साली 152 पोलीस कर्मचार्‍यांना उत्कृष्ट तपासासाठी केंद्रीय गृहमंत्री पदकं प्रदान करण्यात आलं होतं. 2021 मध्ये हे पुरस्कार मिळालेल्या कर्मचार्‍यांमध्ये सीबीआयचे 15, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र पोलिसांचे प्रत्येकी 11, उत्तर प्रदेशचे 10, केरळ आणि राजस्थान पोलिसांचे नऊ, तामिळनाडू पोलिसांचे आठ, बिहारचे सात, गुजरातमधील प्रत्येकी सहा पोलिसांचा समावेश आहे.