उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, १४ खासदार शिंदे गटाच्या बैठकीला हजर

    दिनांक : 18-Jul-2022
Total Views |
मुंबई : शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेला मोठी गळती लागली आहे. आता तर खासदार सुद्धा शिंदे गटाच्या गळाला लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची बैठक सुरू असताना शिवसेनेचे 14 खासदार हे ऑनलाईन बैठकीला हजर असल्याचे समोर आले आहे.
 

Khasdar 
 
राष्ट्रपती निवडणुकीसाठी शिंदे गटाच्या आमदारांची मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये शिवसेनेचे खासदार उपस्थितीत असल्याचा मोठा धक्का शिवसेनेला बसला आहे. शिवसेनेचे 14 खासदार हे शिंदे गटाच्या बैठकीला हजर आहे. एकूण18 खासदारांपैकी 14 खासदार हे शिंदे गटाच्या बैठकीला हजर असल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार हे शिंदे गटात सामील होणार अशी चर्चा रंगली होती. आज या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
 
विशेष म्हणजे, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनीच शिवसेनेला संपवण्याचा दिल्लीत कट रचला आहे. शिवसेनेच्या खासदारांनावर ईडी आणि सीबीआयच्या कारवाईचा दबाव टाकला जात आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे.
 
दरम्यान, कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. धैर्यशील माने आणि संजय मंडलिक शिंदे गटात सामील होणार आहे. लवकरच अधिकृत भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरातील मेळाव्याला दोघांनाही दांडी मारली होती.