२६/११ सारख्या हल्ल्याची धमकी प्रकरणीतील एका संशयिताला विरारमधून अटक, एटीएसकडून कसून चौकशी सुरु

    दिनांक : 20-Aug-2022
Total Views |
मुंबई : मुंबईतवाहतूक नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पुन्हा एकदा २६/११ terrorist attack सारख्या हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे.
 

dhamaki 
 
 
 
 
 
हल्ल्याची धमकी देणारे संदेश मुंबई पोलिसांना (Police) पाकिस्तान कोड असलेल्या फोन नंबरवरून आले होते, असे शहर पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी शनिवारी सांगितले. तसेच त्यांनी आम्ही सगळी काळजी घेतली असून लवकरचं याची चौकशी करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले होते. त्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर तासाभराच्या आता मुंबई पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. विरारमधील (Virar) एकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मुंबई गुन्हे शाखा आणि एटीएसकडून संशयित इसमाची कसून चौकशी सुरु आहे. पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेली व्यक्ती उत्त रप्रदेशातली आहे.
 
वाहतूक शाखेच्या हेल्पलाइन क्रमांकावर अनेक धमकीचे मॅसेज
 
शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या हेल्पलाइन क्रमांकावर अनेक धमकीचे मजकूर प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेण्यात आली होती. देण्यात आलेल्या मॅसेजमध्ये हल्ला करुन शहर उडवलं जाईल असा मॅसेज दिला होता. फणसळकर यांनी सांगितले की मुंबईला 26/11 हल्ल्या सारखे उडवण्याचे धमकीचे संदेश पाकिस्तान कोड असलेल्या नंबरवरून आले होते. त्यामुळे पोलिसांना अलर्ट देण्यात आला आहे. आम्ही सगळे संदेश गांभीर्याने घेतले आहेत. धमकीच्या संदेशांची चौकशी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. आम्ही किनारपट्टीच्या सुरक्षेबाबत सतर्क आहोत आणि तटरक्षक दलाशी समन्वय साधत आहोत असेही त्यांनी जाहीर केले आहे.
 
पंजाबमधील स्फोटाच्या प्रकरणातील आरोपीला शिर्डीत अटक
 
पंजाबमधल्या एका स्फोटकांच्या प्रकरणात आरोपीला महाराष्ट्र एटीएस आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अटक केली आहे. महाराष्ट्र एटीएसने शिर्डीमधून आरोपीला अटक केली आहे. एटीएसने आरोपीला अटक करून पंजाब पोलिसांच्या हवाली केलं. 16 ऑगस्टला पंजाबमधील एका पीएसआयच्या गाडीत आयईडी ब्लास्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी असलेल्या व्यक्तीला महाराष्ट्रातून अटक केली आहे. या प्रकरणात याआधीच पंजाब पोलिसांनी दोन आरोपीना अटक केलेली आहे.