सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी ... पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कपात, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

    दिनांक : 14-Jul-2022
Total Views |
मुंबई : 14 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्यांना दिलासा मिळावा यासाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरकपातीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
 
 

shinde1 
 
 
मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. पेट्रोलचे दर पाच रुपयांनी तर डिझेलचे दर तीन रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे महागाईने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पेट्रोल डिझेलचे दर कमी झाल्याने इतर वस्तूंचे दर कमी होण्यासही येत्या काळात मदत होईल. 
 
राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करुन सर्वसामान्यांना दिलासा देणार असल्याचा शब्द दिला होता. केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी कमी केल्यानंतर राज्य सरकारने व्हॅट कमी करावा अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांना केली होती. अनेक राज्यांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर व्हॅट कमी केला होता. मात्र महाराष्ट्रात याबाबत निर्णय घेण्यात आला नव्हता.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, ४ नोव्हेंबर २०२१ आणि २२ मे २०२२ रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात केंद्र सरकारने कपात केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी राज्य सरकारांनाही तसं आवाहन केलं होतं की राज्यांनी आपल्या इथं इंधनावरील कर कपात करावी. मात्र, काही राज्यांनी कर कपात केली नव्हती. पण आता युतीचं सरकार स्थापन झाल्यावर ठरवलं की, जनतेच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत. त्यामुळेच आम्ही पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर ३ रुपयांनी कर कपात करण्याचा निर्णय़ घेतला आहे. या निर्णयामुळे राज्य शासनाच्या तिजोरीवर जवळपास ६ हजार कोटींचा भार पडेल.