आनंदाची बातमी ... फक्त दोनच दिवसांत बनेल PAN Card; जाणून घ्या संपूर्ण माहिती

    दिनांक : 27-Aug-2022
Total Views |
मुंबई : आजकाल पॅनकार्ड अनेक ठिकाणी वापरलं जातं. पॅनकार्ड (PAN Card) हे भारतातील एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. विशेषत: तुमच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पॅनकार्डचा अधिक वापर केला जातो. याशिवाय ओळखपत्र म्हणूनही त्याचा वापर करू शकता. परंतु अनेकांना पॅनकार्ड मिळविण्यासाठी समस्येचा सामना करावा लागतो. कारण ते मिळण्यासाठी 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागतो.
 

pan 
 
 
 
पण तुम्हाला आता इतकी प्रतीक्षा करण्याची गरज नाही. हवं असल्यास दोन दिवसांत म्हणजे 48 तासांत पॅन कार्ड मिळू शकतं. त्यामुळं तुम्हाला एखाद्या तातडीच्या कामासाठी 15 ते 20 दिवस प्रतीक्षा करावी लागणार नाही. तुम्ही फक्त 48 तासांत पॅन कार्ड कसं बनवू शकता त्या बाबत पहा संपूर्ण प्रक्रिया
 
- प्रथम NSDL च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
 
- PROMOTED CONTENT
 
- आता फॉर्म निवडा आणि ऑनलाइन अर्ज करा.
 
- फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा आणि तपासा.
 
ज्यांना ऑफलाइन अर्ज करायचा आहे त्यांनी वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करा आणि जवळच्या सेवा केंद्रात सबमिट करा. अर्ज पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला पावती क्रमांक मिळेल, ज्याच्या मदतीनं तुम्ही तुमच्या अर्जाचा मागोवा घेऊ शकता आणि स्टेटसची माहिती मिळवू शकता. यानंतर तुम्हाला 15 ते 20 दिवसांत पॅनकार्ड मिळतं. परंतु तुमच्या नोंदणीकृत मेलवर केवळ दोनच दिवसात आयकर विभागाकडून पॅन कार्ड प्राप्त होईल, जे तुम्ही आवश्यक कामांसाठी वापरू शकता.
 
पॅनकार्ड त्वरित मिळविण्यासाठी 'या' गोष्टी आवश्यक आहेत-
 
तुम्हाला पॅनकार्ड त्वरित मिळवायचं असेल तर अर्जासाठी काही कागदपत्रं आवश्यक आहेत.
 
- यासाठी तुमच्याकडे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र असणं आवश्यक आहे.
 
- आधार कार्ड, ओळखपत्र किंवा मतदार ओळखपत्र देखील वापरता येईल.
 
असा करा ऑफलाइन अर्ज
 
- तुम्ही NSDL/UTIITL वेबसाइटवरून पॅन अर्ज फॉर्म 49A मिळवू शकता
 
- किंवा UTITL प्रतिनिधीला विनंती करू शकता.
 
- त्यासाठी फॉर्म भरा आणि सबमिशन करण्यापूर्वी पॅन कार्ड अर्जासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सबमिट करा.
 
- कागदपत्रांमध्ये तुमचं ओळखपत्र, पत्ता आणि जन्मतारीख इ. तुम्हाला द्यावं लागेल.
 
- तुम्हाला प्रोसेसिंग फीसह पॅन कार्ड अर्ज सादर करावा लागेल. 15 ते 20 दिवसांत पॅनकार्ड तुमच्या पत्त्यावर पाठवलं जाईल.