आजचा मेनू : बटाटापूरी

    दिनांक : 08-Oct-2021
Total Views |


batata_1  H x W 
 
 
साहित्य :- 
२ मोठे बटाटे, उकडलेले, १/२ कप साबुदाणा, ७ ते ८ मिरच्या, १/४ कप कोथिंबीर, चिरून, १/२ टिस्पून जिरे, ३ टेस्पून शेंगदाणा कूट, १ टिस्पून जिरेपूड, १ ते २ टेस्पून शिंगाडा पिठ (टीप), चवीपुरते मिठ, तळण्यासाठी तेल
 
कृती 
१/२ कप साबुदाणा पाण्यात भिजवावा. अधिकचे पाणी काढून टाकावे. नंतर किंचीत पाणी घालावे. साबुदाण्याच्यावर १/२ सेमी येईल इतपत पाण्याची पातळी ठेवावी. साधारण ३-४ तास अशाप्रकारे भिजवून ठेवावे. भांडे वरून झाकावे. मिक्सरमध्ये ७-८ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे आणि थोडे मिठ घालून बारीक करावे. पाणी घालू नये. शिजवलेले बटाटे किसून घ्यावे. त्यात मिरची-कोथिंबीरीचा ठेचा, शेंगदाणा कूट, भिजवलेले साबुदाणे, जिरेपूड आणि शिंगाडा पिठ घालून निट मळून गोळा बनवावा. चव पाहुन, लागल्यास मिठ घालावे. मध्यम दिड इंचाचे गोळे करावे. तेल तापत ठेवावे. तेल तापले कि आच मिडीयम हायवर ठेवावी. एक प्लास्टिकचा जाड तुकडा घ्यावा. त्याला तेलाचा हात लावावा. प्रत्येक गोळा त्यावर जाडसर थापावा आणि मध्यभागी बोटाने भोक पाडावे. पातळ थापू नये, नाहीतर तेलात टाकल्यावर पुरी तुटते आणि विरघळते. पुरी तेलात टाकल्यावर ती झार्यााने अजिबात पलटू नये. पुरी पलटली ती हमखास तुटते.