..म्हणून कोरोना झालाच असेल असे नाही

    दिनांक : 25-Jul-2021
Total Views |
सध्या कोरोनाच्या भीतीने अनेकांना ग्रासले आहे. साधा तापही आला तरी अनेक लोक कोरोनाची चाचणी करत असल्याचे दिसत आहे. मात्र असे करण्याआधी जरा थांबा. आपण काही अशा लक्षणांबाबत जाणून घेणार आहोत जी अनुभवण्याचा अर्थ तुम्हाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे असा होत नाही.
corona3_1  H x
 
 
 
सौम्य डोकेदुखी
कम्प्युटरवर (Computer) जास्त वेळ बसणे, तासनतास मोबाइल (Mobile) वापरणे, खुप कमी झोप घेणे, इत्यादीमुळे हलकी डोकेदुखी जाणवते. याचा अर्थ तुम्हाला कोरोना झाला आहे असा होत नाही.
अ‍ॅसिडिटी
पोटात काही समस्या झाली की लोकांना वाटते कोरोनाचा प्रारंभिक संकेत आहे. मात्र, अ‍ॅसिडिटी Acidity)इतर कारणामुळे सुद्धा होऊ शकते.
वेदना
वारंवार हलक्या वेदना जाणवणे किंवा मासिक पाळीतील (Menstruation) वेदना असतील तर चिंतेचे कारण नाही. मांसपेशीच्या वेदनांमुळे असे होते याचा कोविडशी संबंध नाही.
घशात खवखव
श्वास घेण्यास त्रास हे कोरोनाचे लक्षण असले तरी हे लक्षात ठेवले पाहिजे की, हे केवळ कोरोनाचेच लक्षण नाही. इतरही लक्षणे दिसायला हवीत. खोकला, (Cough) घशात खवखव, तापासोबत श्वास घेण्यास त्रास होत असेल तर गांभिर्याने घेऊ शकता.
ऐकण्यात त्रास
होय, जर तुम्हाला ऐकायला त्रास होत असेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कोरोना झाला आहे.
हा संकेत कानात मळ झाल्याचा संकेत असू शकतो. किंवा मोठ्या आवाज संगीत ऐकण्याचा एक साइड-इफेक्ट (Side-effects) सुद्धा असू शकतो.