हृदयविकार असणाऱ्या साठी महत्त्वाची माहिती ;हार्ट अ‍टॅक संदर्भात समजू शकते तीन वर्ष आधीच

    दिनांक : 25-Feb-2022
Total Views |
Heart attack : तुम्हाला हार्ट अ‍टॅक येणार की नाही, हे आता तीन वर्ष आधीच समजू शकतं, कसं ते समजून घ्या?
गेल्या काही वर्षांपासून ह्रदयविकाराच्या झटक्याने अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. बदलती जीवनपध्दती, फास्टफूड, मधुमेह, उच्च रक्तदाब, आहाराच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे ह्रदयविकाराचा धोका निर्माण झालेला आहे. भारतात सर्वाधिक ह्रदयविकाराने लोक त्रस्त आहेत. काही वेळा कुठलेही पूर्व लक्षणे न दिसता अचानक ह्रदयविकाराचा झटका येउन मृत्यू होउ शकतो. दरम्यान, आता केवळ वृद्धच नाही तर तरुण पिढीही  हृदयविकाराच्या बळी ठरत आहे. हृदयविकाराच्या वाढत्या घटना हा त्याचाच एक भाग आहे. मात्र, शास्त्रज्ञांनी आता अशी चाचणी शोधून काढली आहे, ज्याच्या मदतीने हृदयविकाराचा धोका सुमारे तीन वर्षे अगोदर ओळखला जाऊ शकतो. यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूचा धोका बर्‍याच अंशी कमी होईल, तसेच मनुष्याचे आयुर्मान  वाढण्यासही यातून मदत होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
 
 

heart attak 
 
 
शास्त्रज्ञांनी हृदयविकाराचा झटका येउन गेलेल्या रुग्णांच्या ‘सी-रिअॅक्टिव्ह’ प्रोटीनची तपासणी केली आहे. म्हणजेच, हे एक चिन्ह आहे जे शरीरातील ‘इंफ्लेमेशन’बद्दल माहिती देत असते. शास्त्रज्ञांकडून ‘ट्रोपोनिन’ची प्रमाणित चाचणीदेखील करण्यात आली आहे. हृदयाचे नुकसान झाल्यावर रक्तातून बाहेर पडणारे हे एक प्रथिन आहे. अहवालात असे म्हटले आहे की सुमारे 2.5 लाख ‘एनएचएस’ रुग्ण ज्यांनी ‘सीआरपी’ पातळी वाढवली होती आणि ट्रोपोनिन चाचणीतही ते पोझिटीव्ह आले होते, अशा वेळी तीन वर्षांत त्यांच्या मृत्यूची शक्यता सुमारे 35 टक्के इतकी नोंदवली गेली होती.
 
शास्त्रज्ञांच्या या शोधामुळे, योग्य वेळी निरीक्षण करून आणि ‘इंफ्लेमेशन’ प्रतिबंधित औषधांचा वापर करुन अनेकांना ह्रदयविकाराच्या झटक्यापासून तसेच मृत्यूच्या धोक्यापासून वाचवता येउ शकते. इंपीरियल लंडन कॉलेजचे डॉ. रामजी खमीज यांनी सांगितले की, या चाचणीचा शोध अशा वेळी लागला आहे, जेव्हा इतर चाचण्यांपेक्षा अधिक असुरक्षित असलेल्या लोकांमध्ये याचा धोका ओळखला जात आहे. ब्रिटिश हार्ट फाउंडेशनचे प्रोफेसर जेम्स लीपर, यांनी या संशोधनासाठी निधी दिला आहे. त्यांच्या मते, ह्रदयविकाराचा धोका टाळण्यासाठी ही चाचणी परिणामकारक ठरत आहे. तज्ज्ञांनी आपल्या उपचार पध्दतींमध्ये या चाचणीचा नक्की विचार करावा.
 
एका अभ्यासात असे आढळून आले आहे की दररोज सुमारे चार तास सक्रिय राहून क्रियाकलाप केल्यास हृदयविकाराचा धोका 43 टक्क्यांनी कमी होतो.
 
ही लक्षणे दिसताच सावध व्हा
 
रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने हृदयविकाराच्या अनेक लक्षणे सांगितली आहे. यामध्ये छातीत दुखणे किंवा अस्वस्थता सर्वात महत्त्वाची असते. त्याची मुख्य लक्षणे म्हणजे अशक्तपणा, जबडा, घसा किंवा कंबर दुखणे. याशिवाय, दोन्ही हात किंवा खांद्यावर वेदना किंवा अस्वस्थता या लक्षणांवरूनही हृदयविकाराचा झटका ओळखता येतो. श्वास घ्यायला त्रास होणे हेदेखील हृदयविकाराचे लक्षण असू शकते.