ही लस घ्या, कॅंन्सर पासून सुरक्षित राहा

    दिनांक : 22-Jan-2022
Total Views |
कॅंन्सर (कर्करोग ) : संपूर्ण जगात जानेवारी महिना सवाईकल कर्करोगबाबत जागृती महिना म्हणून पाळला जातो. कॅंन्सर म्हटलं की मनात भीती निर्माण होते.
 
 

vaccin 
 
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे सवाईकल कॅन्सर (cancer) हा सर्वाधिक महिलांना होतो. या कॅन्सरमुळे सगळ्यात जास्त महिलांचा मृत्यू होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, 2020 मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात हे लक्षात आलं आहे की, जगात जवळपास 6,04,000 महिलांना हा कर्करोग झाला होता. तर जवळपास 3,42,000 महिलांनी यामुळे आपला जीव गमावला होता. साधारण हा कर्करोग ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV)यामुळे होतो. हा पुरुषांनाही होऊ शकतो. आज या कर्करोगापासून वाचण्यासाठी लस निर्माण झाली आहे. मात्र या लसीबद्दल हवी तशी जनजागृती झाली नाही. आज आपण या कर्करोगाबद्दल आणि लसीबद्दल जाणून घेणार आहोत.
 
लसीद्वारे घाला कॅन्सरला आळा :
 
भारतामध्ये कॅन्सरशी लढण्यासाठी सध्या दोन प्रकारच्या लशी उपलब्ध आहेत. भारतात बायव्हॅलेंट आणि क्वाड्रिव्हॅलेंट एचपीव्ही लसींला 2008 मध्ये मान्यता मिळाली आहे. म्हणजे आज जवळपास भारतात 14 वर्षांपासून कॅन्सरविरोधात लस उपलब्ध आहे. मात्र आजही त्याप्रमाणात या लसीबद्दल जनजागृती नाही.
 
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग
 
गर्भाशय आणि योनीमार्गाला जोडणारा भाग ग्रीवा किंवा सर्विक्स जो गर्भाशयाच्या खालच्या बाजूस योनीमार्गात उघडतो. या ठिकाणी होणारं संक्रमण म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर.
 
काय असतो हा ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) ?
 
HPV हा सामान्यपणे लैंगिक संबंधातून संक्रमित होतो. आपल्यापैकी 80% लोकांना आयुष्यात एकदातरी या विषाणूची बाधा होते. त्याची सहज लागण असून त्याचं संक्रमणही सहज होतं. पण तुम्ही HPV पॉझिटिव्ह असेल म्हणजे कॅन्सरचं झाला आहे असं नाही. कारण या व्हायरस 200 प्रकार आहेत. त्यात 14 प्रकार हे गंभीर आजारात मोडतात. त्यात या कॅन्सरचा समावेश आहे. साधारण HPV झालेल्या महिलांना काही उपचार न घेता ही बरा होत्यात. मात्र हा व्हायरस दीर्घ काळ तुमचा शरीरात राहिला आणि त्यातून जखम तयारीहून त्याकडे दुर्लक्ष झाल्यास तुम्हाला या कॅन्सरचा धोका अधिक असतो.
 
HPV होण्याची कारणं
 
१. त्वचेला झालेल्या जखमेतून हा विषाणू त्वेचपासून त्वचेच्या संपर्कात आल्यावर होतो
२. हा विषाणू ज्यांच्या शरिरात आहे अशा व्यक्तीने दुसऱ्यासोबत संभोग केल्यास होतो.
३. लैंगिक संबंधात जास्त सक्रिय असणाऱ्या महिलांना याची लागण होऊ शकते.
४ तोंडावाटे संभोग केल्यावर हा व्हायरस तोंडात आणि श्वसनमार्गात जाऊ शकतो.
 
HPV चे प्राथमिक लक्षणं
 
• मासिकपाळीच्या दिवसात अति-रक्तस्राव आणि वारंवार पाळी
• योनीमार्गातून सतत पांढरा द्रव (White Discharge) येणे
• पांढरा द्रवाला घाणेरडा वास येणं
• वारंवार योनीमार्गाचं इंन्फेक्शन
• लैंगिक संबंध ठेवल्यानंतर रक्तस्राव
 
HPVसाठी करावयाची टेस्ट
 
 
यासाठी पॅपस्मिअर ही टेस्ट करावी. साधारण वयाच्या 30 ते 65 वर्षांपर्यंत दर तीन वर्षांनी गर्भाशय मुखाची पॅपस्मिअर तपासणी करावी.
 
ही लस कोण घेऊ शकते ?
 
1. 9 ते 15 वयोगटातील मुलीं ही लस घेऊ शकतात
2. लस ही दोन डोसमध्ये दिली जात असून,साधारणतः डोसमध्ये 6 महिन्यांचे अंतर असते.
3. तुम्ही जर 25 वर्षांच्या असाल आणि ही लस घेतली नसेल तर तुम्हाला तीन डोस घ्यावे लागतील.
4. 25 वर्षांवरील मुली ही लस घेऊ शकतात मात्र याचा प्रभाव जास्त वेळ राहत नाही.
 
टीप :आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारे घेण्यात आला आहे . या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा