नेट परीक्षा 6 ते 11 ऑक्टोबरदरम्यान

    दिनांक : 12-Aug-2021
Total Views |
नवी दिल्ली : राष्ट्रीय चाचणी संस्थेने नेट परीक्षेची तारीख आज बुधवारी जाहीर केली असून, ही परीक्षा 6 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. कोरोनामुळे डिसेंबर 2020 सत्राच्या परीक्षा आयोजित करण्यात आणि जून 2021 च्या अर्जाच्या प्रक्रियेत विलंब झाला. त्यामुळे दोन्ही सत्रांच्या परीक्षा एकाच वेळी घेण्यात येत आहेत. 

UGC_1  H x W: 0 
ऑक्टोबरमध्ये होणार्‍या यूजीसी नेट परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. डिसेंबर 2020 सत्र परीक्षा आणि जून 2021 सत्र परीक्षा एकत्र घेण्यात येईल. या दोन्ही सत्रांची परीक्षा एकाच वेळी 6 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. इच्छुक उमेदवार यूजीसी आणि एनटीएच्या संकेतस्थळावर आभासी अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर, तर शुल्क भरण्याची शेवटची तारीख 6 सप्टेंबर आहे. उमेदवार 7 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या कालावधीत त्यांच्या अर्जामध्ये सुधारणा करू शकतील. पहिले सत्र सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसरे सत्र दुपारी 3 ते सायंकाळी 6 पर्यंत असेल. ही परीक्षा संगणक आधारित पद्धतीने घेतली जाईल. या परीक्षेत दोन प्रश्नपत्रिका असतील. दोन्ही प्रश्नपत्रिकांमध्ये बहुपर्यायी प्रश्न असतील.