GATE परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

    दिनांक : 04-Aug-2021
Total Views |
नवी दिल्ली : GATE २०२२ चे पूर्ण वेळापत्रक जाहीर झाले असून यानुसार ३० ऑगस्ट २०२१ पासून ऑनलाइन नोंदणीला सुरुवात होणार आहे. तर २४ सप्टेंबर २०२१ पर्यंत ही नोंदणी करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात अधिक माहिती देण्यात आली आहे. ग्रॅज्युएट ॲप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंगची परीक्षा IIT सहित इतर मोठ्या इंजिनीअरिंग संस्थांमध्ये एमटेक आणि पीएचडी कोर्सेसमध्ये प्रवेशासाठी महत्वाची असते. सरकारी स्कॉलरशिप आणि अप्रेंटिसशिप्सच्या पात्रतेसाठी ही परीक्षा आयोजित केली जाते. अनेक सरकारी नोकऱ्या देखील गेटमधील गुणांच्या आधारे दिल्या जातात. वर्ष २०२२ मध्ये ही परीक्षा आयआयटी खरगपूर (IIT kgp)च्या माध्यमातून आयोजित केली जात आहे.
 
gate 2022_1  H   
 
गेट २०२२ परीक्षेचे आयोजन ५ फेब्रुवारी, ६ फेब्रुवारी, १२ फेब्रुवारी आणि १३ फेब्रुवारी २०२२ ला केले जाणार आहे. आयआयटी खरगपूरने दिलेल्या माहितीनुसार करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या वेळापत्रकामध्ये बदल देखील केला जाऊ शकतो. गेट २०२२ साठी ऑनलाइन नोंदणीची सुरुवात ३० ऑगस्ट २०२१ होणार आहे. रेग्यूलर ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख असेल २४ सप्टेंबर २०२१, लेट फीससहित नोंदणीची शेवटची तारीख १ ऑक्टोबर २०२१, तर परीक्षेची तारीख असेल ५, ६, १२ आणि १३ फेब्रुवारी २०२२, आणि गेट रिझल्टची तारीख असेल १७ मार्च २०२२.
 
गेट २०२२ नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करावी लागणार आहे. गेट २०२२ ची वेबसाइट gate.iitkgp.ac.in वर जावे लागेल. तुम्ही एक किंवा दोन पेपर्ससाठी अर्ज करु शकता. पण एकच अर्ज भरला जाईल. जर तुम्ही एकाहून अधिक अर्ज भरले तर स्वीकारले जाणार नाहीत. इतर अर्ज रद्द केले जातील आणि त्याचे शुल्क परत केले जाणार नाही. एससी, एसटी, दिव्यांग आणि सर्व महिला उमेदवारांसाठी गेट अर्ज शुल्क ७५० रुपये आहे. लेट फीससहित एकूण फीस- १ हजार २५० रुपये याचप्रमाणे इतर सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क असेल १ हजार ५०० रुपये, तर लेट फीससहित २ हजार रुपये शुल्क भरावे लागतील.