इमरान खान हे लष्कराच्या हातातले बाहुले : रेहम खान
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :20-Feb-2019
 
 
 
 
इस्लामाबाद : पुलवामा हल्ल्यानंतर रोषाला सामोरे जावे लागणाऱ्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा आता त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी रेहम खान यांनीही समाचार घेतला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे लष्कराच्या हातचे बाहुले आहेत, अशी टीका खान रेहम खान यांनी केली आहे.
 
इम्रान यांनी पुलवामा हल्ल्यावर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर देशभरातून पडसाद उमटू लागले. यावेळी रेहम यांनी ही टीका केली आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात ४५ भारतीय जवानांना वीरमरण आले. पाकिस्तानी सैन्याने सूचना केल्याप्रमाणेच पुलवामावरील दहशतवादी हल्ल्याबाबत खान यांनी प्रतिक्रिया दिली, असा आरोपही रेहम यांनी केला.
 
 
विचारसरणीशी तडजोड करून इम्रान सत्तेत आले आहेत, असेही रेहम म्हणाल्या आहेत. भारत कुठल्याही पुराव्याविना पाकिस्तानवर दोषारोप करत आहे, असा आरोप इम्रान यांनी केला होता. ते एका पाकिस्तानी रेडिओवर बोलत होते. आमच्यापैकी कोणी हिंसा पसरवावी असा आमचा उद्देश नाही. मी भारत सरकारला हे सांगू इच्छितो की, जर कोण्या पाकिस्तानी व्यक्तिविरोधात काही पुरावे आढळले तर आम्हा त्यावर कडक कारवाई करू, असेही इम्रान यांनी सांगितले होते.
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...https://www.facebook.com/Tarunbharatjal/