डोंबिवली सह. बँकेतर्फे 'ग्राहक जोडो अभियान'; ५२ व्या वर्धापनदिनानिमित्त वाहन मेळावा

    दिनांक : 08-Sep-2022
Total Views |
 
जळगाव : येथील डोंबीवली नागरी सहकारी बँकेच्या जळगाव शाखेतर्फे 'ग्राहक जोडो अभियान' उत्साहात पार पडले. यावेळी डोंबीवली नागरी सहकारी बँकेच्या ५२ व्या वर्धापनदिनानिमित्त इलेक्ट्रीक वाहन मेळाव्यास ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मान्यवरांच्या उपस्थितीत वर्धापनदिनानिमित्त ग्राहक जोडो अभियान तसेच इलेक्ट्रीक वाहन मेळाव्याचे उद्घाटन दिपप्रज्वलनाने करण्यात येवून बँकेच्या विविध कर्ज योजनांची माहीती उपस्थितांना दिली.

 
vardhapan2
 
 
 
 
यावेळी डोंबीवली बँकेचे सहायक सरव्यवस्थापक राजेश शेटे, जळगाव शाखा व्यवस्थापक तुषार कुळकर्णी, जुने खातेदार ग्राहक, उद्योजक, वकील, व्यावसायिक, चार्टर्ड अकाऊंटंट, शाखेचे कर्मचारी आदी उपस्थित होते.