धक्कादायक... अमळनेर पोलिसात विनयभंगसह जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    दिनांक : 04-Sep-2022
Total Views |
जुन्यावादातून दोन महिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, तिघांना जबर मारहाण तर एकाची प्रकृती गंभीर !
 
 
अमळनेर : तालुक्यातील एका गावात जुन्या वादातून दोन महिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न तर तिघांना जबर मारहाण करण्यात आलीआहे. . यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी ९ जणांविरुद्ध विनयभंगा सह जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 

crime
 
 
 
 
 
सविस्तर वृत्त असे कि, ३ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास फिर्यादीची वहीणी ह्या सकाळी गावातील सार्वजनिक हाळवर धुणे धुण्यासाठी गेले होते. धुणे धुऊन परत येत असतांना ९.३० वाजेच्या सुमारास गावातील गावदरवाज्या जवळ आमच्या विरुध्द केलेल्या केसेस मागे घ्या. नाही तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, असे बोलुन विनोद सुकदेव पवार याने बळाचा वापर करुन पिडीतेचा हात पकडला आणि शरद उखा पवार यांने अश्लिल कृत्य केले. यानंतर पिडीत महिलेने तिथून पळ काढला. त्यानंतर फिर्यादीच्या घरासमोर १) विनोद सुकदेव पवार २) नितीन उखा पवार ३) रुपाबाई उखा पवार ४) शरद उखा पवार ५) उखा बुधा पवार ६) विमल बाई उखा पवार ७) रतीलाल रामलाल पाटील ८) हर्षल रतीलाल पाटील ९ ) प्रमोद रतीलाल पाटील यांच्या हातात लाकडी दांडा, तसेच एक प्लॅस्टीक बॉटल पेट्रोलने भरलेली लोखंडी रॉड, काठ्या होत्या. अशांनी फिर्यादीच्या घरासमोर येऊन परिवारातील आई, वहीणी, यांच्या अंगावर शरद पवार याने त्याच्या हातातील भरलेली प्लॅस्टीकची बाटली मधील पेट्रोल त्यांच्या अंगावर टाकले व विनोद सुकदेव पवार याने त्याच्या हातातील काडी पेटीने जाळून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
 
इतर लोकांनाही धक्काबुक्की व चापटा बुक्यांनी मारहाण केली आहे. सदर भांडणात फिर्यादीचा भाऊ संदीप पाटील हा गंभीर जखमी असून सतिष पाटील यांना देखील मार लागल्याने वरील दोघांना अमळनेर येथील डॉ. अनिल शिंदे, यांचे नर्मदा फॉऊंडेशन, अमळनेर उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर संदीप पाटील हा अद्याप पावेतो आय.सी.यु. मध्ये अॅडमीट असुन शुध्दीवर आलेला नाही. दरम्यान, याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील सपोनि जयेश खलाणे हे करीत आहेत.