PFI विरोधात सरकारकडून धडक कारवाई सुरु ! महाराष्ट्रासह तब्बल 200 ठिकाणांवर छापे, 170 जण ताब्यात

27 Sep 2022 11:09:36
 
नवी दिल्ली :पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) विरोधात सरकारने धडक कारवाई सुरू केली असून आज सकाळी तब्बल 200 ठिकाणांवर छापे टाकत 170 सदस्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे. यादरम्यान पोलिसांनी सात राज्यांमध्ये छापे टाकले आहेत. अलीकडेच, राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) ने 13 राज्यांमध्ये छापे टाकले आणि 100 हून अधिक PFI कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. राज्य पोलीस उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, आसाम, कर्नाटक, दिल्ली आणि महाराष्ट्रात शोध घेत असल्याचे वृत्त आहे. हिंसक निदर्शनांच्या नियोजनाशी संबंधित माहिती मिळाल्यानंतर हे छापे टाकण्यात आल्याचे वृत्त आहे. सर्वोच्च गुप्तचर सूत्रांनी माहिती दिली की, सकाळी 6 वाजेपर्यंत 7 राज्यांमध्ये 200 ठिकाणी छापे टाकून 170 हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.
 

PFI 
 
 
एका वृत्तानुसार, एका गुप्तचर नोटातून समोर आले आहे की, PFI सरकारी संस्था PFI raids , नेते आणि भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक यांच्या संघटनेला लक्ष्य करण्याचा विचार करत आहे. चिठ्ठीनुसार, पीएफआयचे कार्यकर्ते त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना नवी दिल्लीतील तिहार तुरुंगात ठेवल्यानंतर संतप्त झाले आहेत. नोटमध्ये पुढे म्हटले आहे की ,पीएफआयने सरकारविरोधात हिंसक बदला घेण्याचा निर्णय घेतला आहे. पीएफआयने 'बायथीस'चा मार्ग निवडल्याचे वृत्त आहे. हा एक अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ 'मृत्यूचा व्यापारी' किंवा 'फिदायीन' आहे, जो आपल्या मरण्याची किंवा मारण्याची शपथ घेतो. NIA, पोलीस आणि इतर तपास यंत्रणा 8 राज्यांमध्ये छापे टाकत असल्याची माहिती आहे.
 
आसाममधून PFI च्या 7 नेत्यांना अटक करण्यात आली आहे. त्याचवेळी कर्नाटकात 45 सदस्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना स्थानिक तहसीलदारांसमोर हजर करून न्यायालयीन कोठडीची मागणी केली जाणार आहे. असे म्हटले जात आहे की, या अटक किंवा ताब्यात घेतलेल्या पीएफआय PFI raids नेत्यांनी एकतर एनआयएला रोखण्याचा प्रयत्न केला आणि यापूर्वी निदर्शने केली किंवा स्थानिक पातळीवर तणाव वाढवला. पुण्यात, कथित निधी प्रकरणात राज्य पोलिसांनी 6 पीएफआय समर्थकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यूपीच्या सियाना आणि सरुपूरमध्ये कारवाई केल्याचे वृत्त आहे. तसेच मेरठ, बुलंदशहर आणि सीतापूर येथून अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. राजधानी दिल्लीतील शाहीन बाग आणि जामियासह अनेक भागात छापे टाकले जात आहेत. या छाप्यात सुमारे 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0