सावत्र आई चांगली वागणूक देत नसल्याने मुलानेच केला आईचा खून !

    दिनांक : 26-Sep-2022
Total Views |
 
जळगाव : गलंगी (ता. चोपडा) येथील तरूणाने सावत्र आईचा खून केल्‍याची धक्‍कादायक घटना उघडकीस आली आहे. डोक्यात लाकडी दांडा टाकून (Crime) मारले आहे. याप्रकरणी तरूणाला पोलीसांनी (Police) ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.
 


crime1 
 
 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ,गलंगी (ता. चोपडा) येथील सहाबाई शिवराम बारेला (वय ४५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. महिलेचा सावत्र मुलगा दीपक मगन बारेला (वय २५) या संशयित तरूणानेच खून केल्‍याचे समोर आले आहे. दीपक बारेला हा सावत्र आई सहाबाई बारेला यांच्यासोबत राहतो. सावत्र आई चांगली वागणूक देत नसल्याने दिपक कंटाळला होता.
 
रात्री झाले भांडण
 
रविवारी (२५ सप्टेंबर) रात्री दोघांमध्ये वाद झाला होता. या वादात संतापाच्या भरात दिपकने सावत्र आईच्या डोक्यात लाकडी दांडा मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळल्यानंतर चोपडा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, उपनिरीक्षक अमर वसावे व सहकार्‍यांनी घटनास्थळी जात नेमका प्रकार जाणून घेतला. संशयीत तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.