राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया...

    दिनांक : 24-Sep-2022
Total Views |
 
 

khadse 
 
जळगाव : राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीवरून सध्या जळगाव जिल्ह्यामध्ये चांगलच राजकारण तापलं असून याबाबत खडसे यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हटले आहे की गृहमंत्री अमित शहा यांची मी भेट घेतली नसून मी त्यांच्यासोबत फोन द्वारे चर्चा केली आहे याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांना याबाबत मी कल्पना दिली होती . आम्ही दोघ अमित शहा यांची भेट घेणार होतो.   शरद पवार असं कसे  अमित शहा यांना सांगू शकतात की एकनाथ खडसेंना भाजप मध्ये घ्या . हे मंत्री पक्षाचे नसतात देशाचे असतात .मी पुन्हा राष्ट्रवादी मधून भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.