जिन्यातून पडल्याने मद्यपी तरुणाचा मृत्यू, खून झाल्याची अफवा!

    दिनांक : 24-Sep-2022
Total Views |
जळगाव :  शहरातील नवीन बी.जे.मार्केट परिसरात बेसमेंटमध्ये जिना उतरल्यानंतर पडल्याने डोक्याला मार लागून २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. दरम्यान, खून झाल्याची अफवा पसरल्याने मोठा गोंधळ उडाला होता. मयताचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे.
 
 

death1
 
 
 
जळगाव शहरातील आंबेडकर नगर परिसरात राहणाऱ्या अश्विन उर्फ विठ्ठल उर्फ कान्या नितीन मोरे (वय-२२) याचा मृतदेह शनिवारी पहाटे नवीन बी.जे.मार्केटच्या तळघरात आढळून आला. डोक्याजवळ रक्त पडलेले असल्याने तरुणाचा खून झाल्याची अफवा गावात पसरली. घटनास्थळी जिल्हापेठ पोलिसांनी धाव घेतली.
 
जिल्हापेठ पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता अश्विन मोरे हा दारूच्या नशेत जिना उतरला आणि पुढे जात असताना जिन्याच्या भिंतीवर पडला. डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्य झाल्याचे दिसून येत आहे.