कानळद्याचे चे सरपंच, सेवानिवृत्त डीवायएसपी ठरले अपात्र, जिल्हाधिकारी अभिजित राऊतांची कारवाई !

    दिनांक : 23-Sep-2022
Total Views |
 
मासिक सभा न घेणे भोवले ; सरपंचपदी राहण्यास अपात्र 
 
जळगाव : जळगाव जिल्ह्यातीळ कानळदा येथील सेवानिवृत्त पोलिस उपअधिक्षक असलेले सरपंच पुंडलिक तुळशीराम सपकाळे यांना मासिक सभा न घेणे चांगलेच भोवले आहे. यांनी ग्रामपंचायतीची ऑक्टोबर 2021 महिन्याची मासिक सभाच घेतली नाही. याबाबत उपसरपंचासह अकरा ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच व ग्रामसेवकाविरुध्द जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीमध्ये मासिक सभा न घेतल्याचे सिध्द झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सपकाळे यांना सरपंचपदी राहण्यास अपात्र ठरवले आहे.
 
 

jalgaon 
 
 
 
कानळदा ग्रामपंचायतीचे उपसरपंच रुपाली आनंदा सपकाळे यांच्यासह अकरा सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विवाद अर्ज केला होता. ऑक्टोबर महिन्याची मासिक सभा जाणीवपूर्वक व हेतूत: सप्टेंबर २०२१ या महिन्याचा आर्थिक हिशोब लपवण्याच्या उद्देशाने घेतली नाही. नियमानुसार दर महिन्याला ग्रामपंचायतची एक सभा झाली पाहिजेत. सरपंचांनी ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 3 मधील तरतुदीचा भंग केला असल्याचा लेखी युक्तीवाद अर्जदारांकडून करण्यात आला. सप्टेंबर ते नोव्हेंबर 2021 मधील मासिक सभेचे प्रोसिडींगची प्रत मिळण्यासाठीही त्यांनी लेखी अर्ज केला होता.

मासिक सभेत तांत्रिक अडचणी
 
ऑक्टोबरची मासिक सभा झालेली नसल्याने प्रत देता येणार नसल्याचे ग्रामसेवकाने त्यांना लेखी कळवले. ग्रामसेवकाविरुध्द प्रशासकीय कारवाई करण्याचीही मागणी ग्रा.पं. सदस्याची केली होती. मात्र, आर्थिक हिशोब लपवण्याच्या दृष्टीने सभा घेण्यात आल्याबाबत कोणताही दस्ताऐवज अर्जदार सादर करु शकले नाहीत. मासिक सभा घेण्यात तांत्रिक अडचणी होत्या.
 
आरोप निराधार
 
ग्रामपंचायतीचा पदभार असलेले ग्रामसेवक डी.एस.पाटील हे त्या काळात वैद्यकीय रजेवर गेलेले होते. त्यांच्या जागेवर नवीन ग्रामसेवक नियुक्त करण्याबाबत सरपंचाने प्रशासनाकडे मागणी केली होती. ग्रामपंचायत सदस्यांनी पुरावे सादर न केल्याने आर्थिक व्यवहार केल्याबाबतचे आरोप निराधार असल्याचे सरपंच सपकाळे यांनी सुनावणीत सांगितले. मात्र, त्यांनी मासिक सभा घेतली नसल्याचे सिध्द झाल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी त्यांना अपात्र ठरवले.
 
सभेचा अजेंडा घरावर
 
सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्याचा अजेंडा ग्रामपंचायत सदस्यांकडे पाठविला होता. त्यांनी हेतु पुरस्सर अजेंडा स्विकारला नव्हता. त्यामुळे हा अजेंडा ग्रामसेवकाच्या आदेशानुसार अर्जदाराच्या घरांवर डकवाला लागला. त्याचे दस्तऐवज सरपंचाकडून सादर करण्यात आले होते. केवळ एक मासिक सभा न घेतल्याने सरपंच अपात्र झाले आहेत.