धक्कादायक : भांडण सोडविण्यास गेलेल्या पोलीस पाटलावर तलवारीने वार

    दिनांक : 20-Sep-2022
Total Views |
जळगाव : भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस पाटलावर तलवारीने वार करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 

crime
 
 
 
पोलीस पाटील विजय हरिदास पवार यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पाचोरा तालुक्यातील मोहाडी येथे जगन हंसराज जाधव हा त्याच्या आईसोबत घरात भांडण करून मारहाण करत असताना पोलीस पाटील विजय हरिदास पवार यांनी मध्यस्थी केली. दरम्यान मध्यस्थी केल्याचा राग आल्याने जगन जाधव यांनी पोलीस पाटील विजय पवार यांना शिवीगाळ करून तलवारीने उजव्या हाताने मनगटावर वार करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी १८ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.
 
याप्रकरणी पोलीस पाटील विजय पवार यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी जगन हंसराज जाधव रा. मोहाडी ता. पाचोरा याच्या विरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक शैलेश चव्हाण करीत आहे.