मालेगाव शहरात भर दिवसा दरोडा , गॅस एजन्सीमध्ये, पिस्तुलचा धाक दाखवून १ लाख लांबविले !

20 Sep 2022 17:19:40
नाशिक :नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या सटाणा नाका भागातील कलंत्री गॅस एजन्सीमध्ये दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना घडली उघडकीस आली आहे.
 

daroda 
 
 
 
सूत्रांकडून मिळालेलय माहितीनुसार, मालेगाव शहरात कलंत्री गॅस एजन्सीमध्ये भर दिवसा तोंडाला रुमाल बांधून घुसलेल्या दोन अज्ञात चोरटयांनी कर्मचाऱ्यांना पिस्तुलचा धाक दाखवत १ लाखांची रोकड घेवून पलायन केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात(Nashik) खळबळ उडाली असून गॅस एजन्सीतील दरोडयाची मोठी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला आहे. या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलीसांनी (Rural Police) गुन्हा (Crime) दाखल केला असून संशयितांचा शोध सुरू आहे.
 
पाऊस चालू असताना हे दोघे चोरटे दुचाकी वर आले होते. हातात पिस्टल आणि चाकू दाखवत पैशाची मागणी केल्याने एजन्सीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटिव्हीच्या आधारेच पोलिसांना आरोपीचा शोध घ्यावा लागणार आहे.
 
लुटारू मराठी भाषेत दमबाजी करत असल्याने ते स्थानिक आणि माहितगार असल्याचा पोलीसांना संशय आहे. एजन्सीतील संगणक चालक अजय बाबाजी गोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. तक्रारीवरून छावणी पोलिस ठाण्यात जबरी लुटीचा आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल असून पोलीसांकडून तपासाला वेग देण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0