गुलाबराव देवकर सिजनेबल पुढारी!

    दिनांक : 16-Sep-2022
Total Views |
पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची टिका

धरणगाव : सात वर्षात शांत बसून असलेले बरेच जण आता उत्साहात आले आहेत. त्यात गुलाबराव देवकर हे तर सिजनेबल पुढारी असल्याची टिका पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
 

Gulabrao 
 
विरोधी पक्षनेते अजित पवार हे गुरूवारी जिल्हा दौर्‍यावर होते. यावेळी आपल्या भाषणात माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व शिवसेनेचे अन्य आमदार आता निवडणून येणार नाही असे विधान जळगाव येथील मेळाव्यात केले होते. याचा समाचार गुलाबराव पाटील यांनी घेतला. ते म्हणाले, आता सात वर्षानंतर हे जागे झाले आहेत. अगदी कोणी मरण्याच्या अगोदर हे दारावर जात असल्याची टिका करून हे सिजनेबल पुढारी असल्याची खिल्ली त्यांनी उडविली. एक वर्षावर निवडणुका आल्याने हे सर्व बाहेर निघाले आहे. सात वर्षात हा तालुका कोठे होता, लोकांचे काय चालले होते हे काहीही यांना माहित नाही, आम्ही सिजनेबल नाही चोवीस तास फिरणारे आहोत. भविष्यात कुणाला तिकीट मिळणार हे त्यांनी अगोदर ठरवावे. उद्धव ठाकरे गटाला तिकीट मिळणार की राष्ट्रवादीला हे अगोदर ठरवा व मग मैदानात या अशीही टिका गुलाबराव पाटील यांनी केली. देवकर यांना चार वर्षांची शिक्षा झाली आहे. चार वर्षांची शिक्षा झालेला माणून उमेदवार होऊ शकत नाही, याचीही त्यांनी माहिती घ्यावी असे ते म्हणाले.
 
२० दिवस पाणी नाही
 
धरणगाव शहरास २० दिवसांपासून पाणी पुरवठा नाही. याकडे पाटील यांचे लक्ष वेधले असता या संदर्भात माहिती घेऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या जातील असेही ते म्हणाले. धरणगाव येथे जिल्हा रूग्णालयासाठी प्रयत्न असल्याची माहितीही त्यांनी दिली.