हिंदूविरोधी देशतोडू द्रमुक

    दिनांक : 16-Sep-2022
Total Views |
ए. राजा यांनी काही दिवसांपूर्वी वेगळ्या तामिळनाडू देशाची मागणी करत केंद्र सरकारला धमकी दिल्याचे पाहायला मिळाले. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आताच्या हिंदूविरोधी विधानाकडे पाहिले पाहिजे.

dramuk 
 
 
पर्यंत तुम्ही हिंदू आहात, तोपर्यंत तुम्ही शुद्र आहात. जोपर्यंत तुम्ही शुद्र आहात, तोपर्यंत तुम्ही वेश्यापुत्र आहात. जोपर्यंत तुम्ही हिंदू आहात, तोपर्यंत तुम्ही पंजायथु-दलित आहात आणि जोपर्यंत तुम्ही हिंदू आहात, तोपर्यंत अस्पृश्य आहात. सर्वोच्च न्यायालय म्हणते की, तुम्ही ख्रिश्चन, मुस्लीम वा पारशी नसाल तर तुम्हाला हिंदू व्हावे लागेल. असा अत्याचार अन्य कोणत्या देशात पाहिला? द्रमुक आणि द्रविड कळघमच्या मुखपत्रांनी आता या मुद्द्याविरोधात आवाज उठवण्याची वेळ आली आहे.
 
तुमच्यापैकी किती लोक वेश्यापुत्र, अस्पृश्य म्हणून राहू इच्छिता असे तुम्ही दरडावून विचारले तरच सनातन धर्माची मूळे नष्ट होतील,” असे अतिशय वादग्रस्त आणि संतापजनक विधान तामिळनाडूतील सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघमचे खासदार ए. राजा यांनी केले. मात्र, त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण, पेरियार इ. व्ही. रामास्वामी व त्यांची विचारधारा.
 
असे म्हणतात की, “मनगटातले बळ संपले की, माणसाला जात आठवते. पेरियार इ. व्ही. रामास्वामी तर सदैव जातीचेच समाजकारण, राजकारण करत आले. त्यांना तामिळनाडूतील एकमेव दलित विचारवंत मानले जाते. पण, पेरियार इ. व्ही. रामास्वामी खुलेआम हिंदूविरोधी आणि ब्राह्मणविरोधी द्वेष पसरवणारे तथाकथित दलित विचारवंत होते. जर्मनीत हिटलरच्या नाझी सैन्याने ज्यूंच्या केलेल्या सफायाप्रमाणे भारतातही ब्राह्मणांची कत्तल करावी,” असे त्यांचे मत होते.अर्थात, जातीय नरसंहाराला जाहीर प्रोत्साहन देणारे पेरियार इ. व्ही. रामास्वामी यांचे व्यक्तिमत्त्व होते. तसेच, पेरियार इ. व्ही. रामास्वामी हिंदू देव-देवतांचा अपमान करण्यातही सदैव अग्रेसर होते, त्यात त्यांना निराळाच आनंद लाभत असे.
 
तामिळनाडूतील सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम पेरियार इ. व्ही. रामास्वामी यांच्या विचारांवरच चालणारा पक्ष आहे. द्रविड मुन्नेत्र कळघमचे प्रमुख ए. के. स्टॅलिनच आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री असून त्यांचा पक्ष हिंदूविरोधी विचारधारेसाठी कुख्यात आहे. ए. राजा याच पक्षाचे खासदार असून, द्रमुकच्या हिंदूविरोधी विचारधारेत तेदेखील आपले जोरदार योगदान देत असतात. आताचे त्यांचे विधान त्यासारखेच. पण, याच ए. राजा यांनी काही दिवसांपूर्वी वेगळ्या तामिळनाडू देशाची मागणी करत केंद्र सरकारला धमकी दिल्याचे पाहायला मिळाले. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आताच्या हिंदूविरोधी विधानाकडे पाहिले पाहिजे.
 
ए. राजा आपल्याला पेरियार इ. व्ही. रामास्वामी यांच्या विचारांपासून प्रेरणा मिळाल्याचे मानतात. पेरियार इ. व्ही. रामास्वामी हिंदूविरोधी असण्याबरोबरच फुटीरतावादीही होते. कारण, त्यांनीच सर्वप्रथम वेगळ्या तामिळनाडू देशाची मागणी केली होती. ए. राजादेखील त्यांच्या या सार्याच विचारांचे अनुयायी, अनुसरणकर्ते आहेत. त्यांच्या आताच्या विधानावरून व द्रमुकच्या विचारधारेवरून तो पक्ष ‘तुकडे-तुकडे गँग’चाच सदस्य असल्याचे स्पष्ट होते.
 
90च्या दशकातल्या ‘तुकडे-तुकडे गँग’ने काश्मीर खोर्यात अराजक निर्माण केले. धर्मांध इस्लामी जिहाद्यांनी काश्मीर खोर्यातील हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, त्यांच्यावर बलात्कार केले, लाखोंना जीवंत मारुन टाकले. त्यानंतर गेल्या काही वर्षांत विविध विद्यापीठांतून ‘तुकडे-तुकडे गँग’ सक्रिय झाली व काश्मीरबरोबरच पूर्वोत्तरातील राज्यांनाही भारतापासून तोडण्याचे स्वप्न पाहू लागली. त्या पार्श्वभूमीवर आताचे ए. राजा यांचे हिंदूविरोधी व तामिळवादी विधान पाहिल्यास द्रमुकला दक्षिणेतही तीन दशकांआधीच्या काश्मीर खोर्यासारखी परिस्थिती तयार करायची असल्याचे दिसून येते. काश्मीरात इस्लामी कट्टरपंथीयांनी हिंदूंचा नरसंहार करत तिथले लोकसंख्या संतुलन बिघडवले. तसाच प्रकार पेरियार इ. व्ही. रामास्वामी यांच्या विचारांना आदर्श मानणारा द्रमुकही करू इच्छितो. पण, एका सत्ताधारी पक्षाचा खासदारच उघडपणे हिंदूविरोधी व देशतोडू विधाने करत असेल तर ते गंभीरच.
 
ए. राजा यांनी हिंदूविरोधी व स्वतंत्र तामिळनाडूवादी विधान करण्याचे मुख्य कारण म्हणजे, नवीन काही करण्याची कुवत नसणे. एम. के. स्टॅलिन यांच्यावर, त्यांच्या द्रमुकवर सत्तेत आल्यापासून भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्यांचे वडील एम. करुणानिधी मुख्यमंत्रिपदी असतानाही द्रमुक भ्रष्टाचारापासून मुक्त नव्हताच. त्यामुळे भ्रष्टाचारात लिप्त असलेल्या द्रमुकला आधी आणि आताही नव्या काळातील नवी आव्हाने पेलता येत नाहीयेत.
 
मग काय करायचे? तर जातीच्या, धर्माच्या नावावर जनतेतच संघर्षाची परिस्थिती तयार करायची. एका समाजाला दुसर्या समाजासमोर उभे करायचे आणि आपल्या राजकारणाचा मतलब साधायचा, असे काम द्रमुककडून सुरू आहे. खरे म्हणजे, पेरियार इ. व्ही. रामास्वामी यांनी अनेक स्वातंत्र्यपूर्व काळापासून हिंदूविरोधी विचार मांडले, दोन जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आज त्यांच्यानंतरच्या तीन-चार पिढ्या येऊन गेल्या, तरी त्यांचे तेच विचार पुढे चालवले जात आहेत. त्यांना समाजाला नवे काही देताच येत नाहीये आणि ए. राजा यांच्या विधानामागे हेच कारण आहे.
 
त्यांच्या विधानाचे दोन उद्देशही दिसतात. तामिळनाडूतील अल्पसंख्य ख्रिश्चन समुदाय द्रमुकचा मतदार असून कोणत्याही परिस्थितीत ख्रिश्चन समुदाय द्रमुकला सोडून जाऊ शकत नाहीत. त्याचे कारण एम. के. स्टॅलिनचा द्रमुक ख्रिश्चन मिशनरीसमर्थक आहे. त्यामुळेच ख्रिश्चन मिशनरी तामिळनाडूत धर्मांतराचा खेळ खेळायला स्वतंत्र असतात. याच धर्मांतराच्या खेळातून उद्भवलेले लावण्या या शालेय मुलीच्या आत्महत्येचे प्रकरणही काही काळापूर्वी चांगलेच चर्चेत आले होते. त्यावरूनही उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने द्रमुक सरकारला खडसावले होते. पण, त्यातून धडा न घेता द्रमुकच्या ए. राजा यांनी धर्मांतराचा खेळ खेळणार्या ख्रिश्चन मिशनर्यांना थेट आमंत्रणच दिल्याचे दिसते.
 
ए. राजा दलितांना वेश्यापुत्र म्हणाल्याने दलित समुदायातील लोक हिंदूंचा द्वेष करतील. अन्य जातीविरोधात त्यांच्या मनात तिरस्कार निर्माण होईल व त्याचा फायदा ख्रिश्चन मिशनर्यांनी घ्यावा, असा ए. राजा यांचा डाव आहे. तथापि, ए. राजा यांनी जे विधान केले, तसा उल्लेख कोणत्याही हिंदू धर्मग्रंथात नाही. तसेच, भारतीय राज्यघटनेनेही दलित व मागास जातींच्या अधिकार रक्षणासाठी आरक्षणासह ‘अॅट्रॉसिटी’ कायदाही केलेला आहे. तरीही, ए. राजा चुकीची व खोटीनाटी माहिती पसरवत आहेत.
 
नुकतीच राहुल गांधींनी तथाकथित ‘भारत जोडो’ यात्रेत ख्रिश्चन पाद्री जॉर्ज पोन्नैयाची भेट घेतली. त्यात जॉर्ज पोन्नैयाने येशूच एकमेव ईश्वर असून हिंदू देव-देवतांना नाकारले व राहुल गांधींनीही ते ऐकून घेतले. तामिळनाडूत ए. के. स्टॅलिन यांच्या सत्ताधारी द्रमुकला काँग्रेसचा पाठिंबा आहे. त्या पक्षाचे एक खासदार हिंदूविरोधी, ख्रिश्चन मिशनर्यांना धर्मांतराचे आवताण देणारे विधान करतात.
 
त्यातून लोकसंख्या संतुलन बिघडवण्याचे व वाढत्या ख्रिश्चन लोकसंख्येच्या माध्यमातून वेगळ्या तामिळनाडू देशाची मागणी पुढे रेटण्याचे त्यांचे कारस्थान असल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत भाजपसह सर्वसामान्य हिंदू व देशभक्त द्रमुकचा विरोध करतीलच. पण, द्रमुकशी आघाडी केलेली काँग्रेसही त्याचा विरोध करेल का? की ‘भारत जोडो’ यात्रा काढत प्रत्यक्षात देश तोडणार्यांचे समर्थन करेल? त्याचे उत्तर, नवे विचार देण्याचे सामर्थ्य नसलेले द्रमुक-काँग्रेससारखे पक्ष, त्यांचे एम. के. स्टॅलिन, ए. राजा, राहुल गांधींसारखे नेते एकमेकांच्या हातमिळवणीतच समाधान मानतील, असे वाटते.