जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात बस दरीत कोसळल्याने 11 ठार

    दिनांक : 14-Sep-2022
Total Views |
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील बरेरी नाल्याजवळ बस खोल दरीत कोसळल्याने 11 जण ठार तर आठ जण जखमी झाले. बस सौजियानहून मंडीकडे जात होती. घटनेनंतर स्थानिक लोक, पोलीस आणि लष्कराने तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
 
 
 
apghat
 
 
जम्मू-काश्मीरचे एलजी मनोज सिन्हा यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. याआधी 30 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात एक कार रस्त्यावरून घसरली आणि 300 फूट खोल दरीत पडली. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले.