यावल तालुक्यात गावठी पिस्तूलसह तरुणालाअटक

    दिनांक : 13-Sep-2022
Total Views |
जळगाव: यावल तालुक्यातील किनगाव-यावल रस्त्यावर एक तरुण लोखंडी गावठी पिस्तूल बाळगताना आढळून आला. दरम्यान, पोलिसांनी त्याला अटक केली असून यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

pistul 
 
 
गोलुसिंग दिलीपसिंग भाटीया (वय २८, रा. बेह्राम्पुरातील जि.खरगोन, मध्यप्रदेश) असे संशयित आरोपीचे नाव आहे. तालुक्यातील किनगाव-यावल रस्त्यावरील मेष ठिबक कंपनीजवळ दि.१२ रोजी ३ वाजेच्या सुमारास हा तरुण संशयित काळ्या रंगाच्या दुचाकीसोबत ३० हजार रुपये किमतीची गावठी पिस्तुल व मॅक्झीनसह आढळून आला. त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास यावल पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबाहले हे करीत आहेत.