लघु उद्योग भारतीचे राज्यस्तरीय अधिवेशन १६ रोजी मुंबईत

13 Sep 2022 20:42:18
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, नारायण राणे यांची उपस्थिती
 
जळगाव, १३ सप्टेंबर : लघु उद्योग भारतीचे राज्यस्तरीय अधिवेशन मुंबईत येत्या शुक्रवारी १६ सप्टेंबर रोजी होणार आहे. अधिवेशनास राज्यभरातून उद्यंोजकांची उपस्थिती लाभणार आहे.
 
 
LUB Jalgaon
 
अधिवेशनात सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी शासनाची ध्येय धोरणे, प्रस्तावित संकल्पना, उद्योजकांच्या अपेक्षा, माहितीपूर्ण चर्चासत्रे, उपयुक्त व अनुभवी मार्गदर्शनपर सत्र, विचारांची देवाणघेवाण, प्रश्‍नोत्तर व मुक्त चर्चा, समस्यांवर उहापोह, उपाययोजनांसदर्भात चर्चा, उद्योग आणि उद्योगांशी निगडीत विविध विभागाच्या माहितीपूर्ण पुस्तिकेचे प्रकाशन आदी महत्वपूर्ण विषयांसह आपापल्या समुहातील उद्योजकांशी संवाद साधण्याची संधी मिळेल. या अधिवेशनास ३६ जिल्हे व किमान १०० तालुक्यांमधून १००० उद्योजक उपस्थित रहाणार असल्याची माहिती लघु उद्योग भारतीचे नाशिक विभाग सचिव समीर साने, जळगाव जिल्हा अध्यक्ष रवींद्र फालक, सचिव समिर चौधरी यांनी दिली.
 
१६ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० ते सायंकाळी ६ पर्यंत स्व. मुकेश पटेल सभागृह, एमआयएमएस कॅम्पस, व्ही.एल. मेहता रोड, विले पार्ले, मुंबई येथे होणार्‍या या अधिवेशनास केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण, केंद्रीय मंत्री नारायण राणे तर विशेष अतिथी म्हणून केंद्रीय वीत्त राज्यमंत्री भागवत कराड, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आदी मान्यवरांची उपस्थिती असेल.
 
अधिवेशनात विविध सत्र होतील. यात प्रामुख्याने कृषी खाद्य प्रक्रिया उद्योगातील संधी, सूक्ष्म व लघु उद्योगांमधील निर्यात संधी, सूक्ष्म लघु उद्योग ब्रांडिंग व विपणन संधी, वित्त पुरवठा अशी सत्र होतील. नोंदणीसाठी लिंक : https://bit.ly/3RWVktd अशी आहे. ज्या उद्योजकांना अधिवेशनास यायचे आहे. त्यांनी रवींद्र फालक (९४२३१८५८३८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0