शिवाजीनगर उड्डाणपूल एस.टी . बसेससाठी सोमवारपासून सुरू

13 Sep 2022 17:15:14
6 किलोमीटरचा फेरा वाचला , पैशांची देखील होणार बचत
 
जळगाव : शिवाजीनगर उड्डाण पूल सोमवार पासून सुरू झाल्याने प्रवाशांच्या वेळ, पैशांची तर बचत झालीच त्याच बरोबर महामंडळाच्या डिझेलची देखील मोठी बचत झाली आहे. विदगावमार्गे जाणाऱ्या सर्व फेऱ्या शिवाजीनगर पुलावरून करण्यात आल्याने 50 गावांसह दोन तालुक्यांतील प्रवाशांचा वेळेची व पैशांची बचत झाली आहे.
 
 
 

bus 
 
 
 
गेल्या चार वर्षांपासून शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने एसटीची वाहतूक गुजराल पेट्रोपंपाकडून वळवण्यात आली होती. वाहतूक वळवण्यात आल्याने चोपडा, यावलकडे जाणाऱ्या बसेसला 6 किलोमीटरपेक्षा अधिक फेऱ्याने जावे लागत होते. याचा फटका महामंडळाला डिझेलच्या रूपाने तर बसतच होताच त्याच बरोबर प्रवाशांचा एक टप्पा वाढून त्याचा आर्थिक भुर्दंड बसत होता. मात्र, आता शिवाजीनगर उड्डाण पूल सुरू झाल्याने लोकांचा हा वेळेची व पैशांची बचत होणार आहे.
 
 
शिवाजीनगर उड्डाण पूल सुरू झाल्याने यावल, रावेरसह जळगाव तालुक्यातील 50 हून अधिक गावातील प्रवाशांचा आर्थिक फायदा झाला आहे. यात धामणगाव, कानळदा, पळसोद, नांद्रा, नंदगाव, रामेश्वर आदी 50 हून अधिक गावातील प्रवाशांना फेऱ्याने प्रवास करावा लागत होता.
 
मशीनमध्ये होणार दोन दिवसांत बदल
 
ईटीआयएम (इलेक्ट्रॉनिक्स तिकीट इश्यू मशीन) मध्ये तिकीट आकारणीबाबत बदल करण्यात येत आहे. दोन दिवसांत तसा बदल करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना शिवाजीनगर उड्डाण पुलापासूनची तिकीट आकारणी करण्यात येत आहे. ईटीआयएम मशीनमध्ये दरातील बदल झाल्यानंतर बसस्थानकापासून तिकीट आकारणी होईल.
 
 
आगार प्रमुख पंकज महाजन म्हणाले, एसटीसाठी शिवाजीनगर उड्डाण पूल सोमवारपासून सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे विदगावमार्गे जाणाऱ्या सर्व बसेस आता या उड्डाण पुलावरून जात आहेत. या आधी या मार्गावरील सर्व बसेसला ६ किलोमीटरपेक्षा अधिक फेऱ्याने प्रवास करावा लागत होता. हा फेरा कमी झाल्याने प्रवाशांचा सहा किलोमीटर फेरीसह दहा रुपयांचा फायदा झाला.
Powered By Sangraha 9.0