रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी... देवळाली पॅसेंजर गुरूवारपासून धावणार !

    दिनांक : 13-Sep-2022
Total Views |
 
पॅसेंजर, एक्स्प्रेस (Railway) होवून होणार मार्गस्‍थ, तिकीट दारातही वाढ
 
जळगाव : कोरोना काळात सर्वच रेल्‍वे गाड्या बंद झाल्‍या होत्‍या. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्‍यानंतर हळूहळू रेल्‍वे सुरू झाल्‍या. परंतु, गेल्या अडीच वर्षांपासून (Bhusawal) भुसावळ देवळाली पॅसेंजर ही बंदच होती. येत्या 15 सप्टेंबरपासून सुरू होत असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही पॅसेंजर एक्स्प्रेस होवून मार्गस्‍थ होणार आहे. यामुळे तिकिटाचे दर देखील वाढण्याची शक्यता आहेत अर्थात प्रवाशांना सोयीची ठरत असलेली गाडी सुरू होत असल्‍याने दिलासा मिळत आहे. परंतु, प्रवाशांना भुर्दंड देखील सहन करावा लागणार आहे.
 
 
 
 
rel1 
 
 
४० टक्‍के तिकिट दर वाढ
 
देवळाली पॅसेंजरला रेल्वे प्रशासनाने एक्स्प्रेसचा दर्जा दिला आहे. यामुळे तिकीट दरात तब्बल ४० टक्के वाढ केली आहे. भुसावळहुन सुटणाऱ्या या देवळाली पॅसेंजरचे पूर्वी भुसावळ देवळालीपर्यंतचे तिकीट ५५ रूपये होते. मात्र, ४० टक्के तिकीट दरवाढीमुळे भुसावळ ते देवळालीचे तिकीट ५५ रुपयांवरून ९५ ते १०० रुपयांच्या घरात आकारण्यात येणार आहे. तसेच जळगाव ते चाळीसगावचे तिकीट हे पूर्वी २५ रूपये होते ते ५० रूपये होण्याची शक्यता आहे.