केरळमधील कन्नूरमध्ये संघ कार्यकर्त्यांच्या घराजवळ बॉम्बस्फोट

    दिनांक : 10-Sep-2022
Total Views |
तिरुअनंतपुरम : केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील कन्नूरमध्ये Bomb blast बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यकर्त्याच्या घरासमोर हा बॉम्बस्फोट झाला. मत्तनूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएसएस कार्यकर्ता सुधीश यांच्या घरापासून ५० मीटर अंतरावर बॉम्बचा स्फोट झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
 
 
 

bomb
 
 
 
 
फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळावरून पुरावे Bomb blast गोळा केले असून श्वान पथकानेही घटनास्थळी भेट दिली आहे.याशिवाय जिल्हा पोलीस प्रमुखांनी घटनास्थळी भेट दिली. सुधीश हाही अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास करण्यात येत आहे. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या महिन्यात या भागात बॉम्बस्फोटानंतर आरएसएस आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला होता. या हाणामारीत अनेक घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले. दुसर्‍या घटनेत, शुक्रवारी कन्नवममध्ये माजी एसडीपीआय कार्यकर्ता सलाहुद्दीन यांच्या घराजवळ बॉम्बस्फोट झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.