कोलकाता येथे ईडीची मोठी कारवाई !

    दिनांक : 10-Sep-2022
Total Views |
 
चिनी लोन ॲप प्रकरणी 7 कोटींची रोकड जप्त
 
कोलकाता : चिनी लोन ॲप (Chinese loan app) फसवणूक प्रकरणात (ईडी) अंमलबजावणी संचालनालयाने पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे मोठी कारवाई केली आहे. फसव्या चिनी लोन ॲप्सशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने कोलकाता येथे छापे टाकून, मोठी रोकड जप्त केली आहे.
 
 

app 
 
 
 
 
मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) 2002 च्या तरतुदींनुसार, कोलकातामधील 6 परिसरांमध्ये मोबाईल गेमिंग ऍप्लिकेशन्सशी संबंधित तपासासंदर्भात आज शोध मोहीम घेण्यात आली. या (Chinese loan app) छाप्यात आतापर्यंत ७ कोटी रुपयांची रोकड मिळाली असून, रोखीची मोजणी सुरू आहे. आणखी अनेक कोटी रुपये रोख स्वरूपात उपलब्ध होतील, असा विश्वास आहे. याआधी चिनी लोन ॲपशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (ईडी) अंमलबजावणी संचालनालयाने बेंगळुरूमधील पेटीएम, रेझरपे आणि कॅशफ्रीच्या ठिकाणांवर ३ सप्टेंबर रोजी छापे घातले होते. 
 
जाणून घ्या चिनी लोन ॲपचे प्रकरण
 
वास्तविक, जेव्हा देशात कोरोनाचा कहर होता, तेव्हा अनेकांनी या इन्स्टंट (Chinese loan app) लोन ॲप्सद्वारे कर्ज घेतले होते. हे ॲप्स चीनमधील कंपन्यांकडून ऑपरेट केले जात होते. हे कर्ज चिनी कंपन्यांकडून अत्यंत महागड्या व्याजदरात उपलब्ध होते आणि फोनमध्ये ॲप्स डाऊनलोड होताच, फोनची सर्व माहिती आपोआप कंपन्यांपर्यंत पोहोचते. ही बाब उघडकीस येताच, या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून, कारवाई सुरू करण्यात आली आहे.