बळीराजाला बाप्‍पा पावला; जळगावात कापसाला मिळाला उच्‍चांकी १६ हजार भाव

    दिनांक : 01-Sep-2022
Total Views |
जळगाव : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर बळीराजाला बाप्‍पा पावला असे म्हणण्यास काही हरकत नाही जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी कापूस खरेदीला सुरुवात झाली. दरम्‍यान (Ganesh Chaturthi) चतुर्थीच्‍या मुहूर्तावर उच्‍चांकी १६ हजार रूपये प्रतिक्‍वींटल इतका दर मिळाला आहे. यामुळे बळीराजामध्‍ये (Farmer) आनंदाचे वातावरण आहे.
 
 

kapus 
 
 
 
 
 
 
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदील सुरवात होत असते. त्‍यानुसार (Jalgaon) जळगाव जिल्‍ह्यात देखील सुरवात झाली आहे. या मुहूर्तावर बोदवड (Bodwad) येथे कापसाला १६ हजार रुपये, तर सातगाव डोंगरी (ता. पाचोरा) येथे १४ हजार ७७२ रुपये इतका उच्चांकी भाव मिळाला आहे. बोदवड तालुक्यात बुधवारी कापूस (Cotton) खरेदीचा श्रीगणेशा करण्यात आला. वैष्णवी ट्रेडर्सचे संचालक राजू वैष्णव यांनी कापूस खरेदीचा शुभारंभ केला. त्यात १६ हजारांचा भाव दिला.