आनंदाची बातमी ... महिन्याच्या पहिल्याच दिवशी LPG सिलेंडर १०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर

    दिनांक : 01-Sep-2022
Total Views |
नवी दिल्ली: इंधनाचे दर गेल्या काही दिवसापासून स्थिर आहेत. आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. १ सप्टेंबर रोजी एलपीजी (LPG) सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात १०० रुपयांनी मोठी कपात करण्यात आली आहे. मात्र, ही दरकपात फक्त व्यावसायिक सिलिंडरवरच झाली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
 
 
 

lpg 
१ सप्टेंबरपासून दिल्लीत १ इंडेनच्या १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमती ९१.५० रुपयांनी, कोलकात्यात १०० रुपयांनी, मुंबईत ९२.५० रुपयांनी, चेन्नईमध्ये ९६ रुपयांनी स्वस्त होणार आहेत.
मुंबईत आजपासून सिलेंडरची किंमत १८४४ रुपयांवर आली आहे. तर दिल्लीत १९ किलो LPG सिलेंडरची किंमत १९७६.५० ऐवजी १८८५ रुपये होणार आहे. तर आता कोलकातामध्ये किंमती १९९५.५ रुपयांपर्यंत खाली आल्या आहेत. तर आधी ते २०९५ रुपये होते.
 
६ जुलैपासून घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच सिलिंडर अजूनही त्याच किमतीत मिळेल. इंडेन गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीत १०५३ रुपये असेल, तर कोलकात्यात १०७९ रुपये, मुंबईत १०५२ रुपये, चेन्नईमध्ये १०६८ रुपये असणार आहे.
 
गॅस कंपन्या दर महिन्याच्या १ तारखेला सिलिंडरची किंमत ठरवतात. यापूर्वी ऑगस्टमध्येही सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. त्यावेळी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ३६ रुपयांची कपात करण्यात आली होती. दिल्लीत १९ किलोच्या सिलेंडरची किंमत आधी २०१२.५० पैसे होती, या कपातीनंतर किंमत १९७६.५० रुपये झाली.