आता ग्रीसमध्येही ‘लव्ह जिहाद’

    दिनांक : 09-Aug-2022
Total Views |
भारत शतकानुशतकांपासून ‘लव्ह जिहाद’च्या या समस्येचा सामना करत आला आहे. आता ग्रीसच्या माध्यमातून जागतिक स्तरावरही ‘लव्ह जिहाद’ची समस्या चर्चिली जायला लागल्याचे दिसत आहे.
 
 
 
love jihad
 
 
लव्ह जिहाद’च्या प्रकरणांवर केवळ भारतच नव्हे, तर संपूर्ण जगभरात पीडितांव्यतिरिक्त कोणीही बोलू इच्छित नाही. पीडितांनीदेखील ‘लव्ह जिहाद’चे नाव घेतले तरी त्याला मुस्लीमविरोधी षड्यंत्र म्हणून धुडकावले जाते वा बिगर मुस्लिमांची कट्टरता वा ‘इस्लामोफोबिया’ म्हटले जाते. पण, बिगर मुस्लीम मुलींविरोधात अतिशय सुनियोजितपणे ‘लव्ह जिहाद’ केला जातो, तरी त्याकडे कोणाचे लक्ष जात नाही वा लक्ष दिले जात नाही. महत्त्वाचे म्हणजे, ‘लव्ह जिहाद’ फक्त हिंदू धर्मीयांपुढचीच समस्या नाही, तर ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारशी अशा जगातल्या सर्वच बिगर मुस्लिमांसमोरची समस्या आहे.
 
विशेष म्हणजे, केरळ उच्च न्यायालयानेच २००९ साली ‘लव्ह जिहाद’चा प्रथम उल्लेख केला होता व त्याला रोखण्यासाठी काम करण्याचे निर्देश दिले होते. तरीही भारतात अजूनही ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या मुलींची दररोज डझनभर तरी प्रकरणे येतच असतात. त्यातली काही प्रकरणे पोलिसांपर्यंत जातात, तर काही जात नाहीत, काही प्रकरणात गुन्हेगाराला शिक्षा होते तर काही प्रकरणात शिक्षा होत नाही. पण, आताचे प्रकरण ग्रीसमधील आहे. ग्रीसमध्ये १७ वर्षीय निकोलेटाची हत्या तिच्या ३० वर्षीय पाकिस्तानी प्रियकराने केल्याचे म्हटले जात आहे. त्याचे नाव सानी. निकोलेटाचे वडील सानीबरोबरील आपल्या मुलीच्या संबंधावर नाराज होते, पण निकोलेटा मात्र खुश होती. तिने कदाचित सानीबरोबर प्रेममय जीवनाची स्वप्नेही पाहिली असतील, पण आता मात्र तिच्या स्वप्नांचा आणि तिचाही खूनच झाला, हेच ‘लव्ह जिहाद’चे वास्तव आहे.
 
‘ग्रीस सिटी टाईम्स’ने यासंदर्भातले वृत्त दिले असून यामुळे ग्रीसमधल्या माध्यमांत व जनतेतही ‘लव्ह जिहाद’ची चर्चा सुरू झाली आहे. वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, ‘लव्ह जिहाद’चे निकोलेटा आणि सानीचे एकमेव प्रकरण नाही. ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये अशी प्रकरणे सामान्य प्रकार झालेली आहेत. वृत्तपत्रानुसार, ही सारीच प्रकरणे ‘लव्ह जिहाद’ची असून त्याचा प्रवेश मात्र पाकिस्तानातून झाला आहे. त्याचीही पार्श्वभूमी आहे. ९०च्या दशकात तुर्कीचे तत्कालीन अध्यक्ष तुर्गुल ओझोल असे म्हणाले होते की, “आपण ग्रीसबरोबर कसलेही युद्ध लढायची गरज नाही. आपल्याला तिकडे केवळ काही लाख शरणार्थी पाठवायचे आहेेत आणि ग्रीसला संपवायचे आहे!”
 
उल्लेखनीय म्हणजे, गेल्या काही वर्षांत ग्रीसमध्ये अचानक सीरियामधील शरणार्थ्यांच्या रुपात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील मुस्लीम ग्रीसमध्ये शरणार्थी म्हणून येत आहेत. ‘ग्रीस सिटी टाईम्स’नुसार, असे शरणार्थी शेकडो, हजारोंच्या संख्येने ग्रीसमध्ये येत असून तुर्की या पाकिस्तानी, अफगाणी मुस्लीम शरणार्थ्यांचा लोंढा रोखण्यासाठी कसलीही उपाययोजना करत नाही.
 
उलट तुर्की पाकिस्तानी आणि अफगाणी शरणार्थ्यांना ग्रीसमध्ये घुसखोरी करण्यासाठी प्रोत्साहन देतो. वृत्तानुसार, ग्रीसमध्ये सध्या एक लाखांपेक्षा अधिक पाकिस्तानी आणि अफगाणी शरणार्थी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, पाकिस्तानी आणि अफगाणी शरणार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणावरील ग्रीसप्रवेशानंतर म्हणजे २०१५ नंतर इथे बलात्कार व लैंगिक गुन्ह्यांत वेगाने वाढ झाल्याचे निदर्शनास आले, आताचा प्रकारही तसाच.
 
ग्रीसमधील जनतेत या प्रकारामुळे प्रचंड क्षोभ आहे. विशेष म्हणजे, एकेकाळी ग्रीसने इस्लामी कट्टरपंथाला पराभूत केले होते. पण, आता ग्रीस पुन्हा एकदा त्याच इस्लामी कट्टरपंथाच्या जाळ्यात अडकतोय. मात्र, वेगळ्या पद्धतीने, सौम्य दहशतवादाच्या माध्यमातून, अर्थात, ‘लव्ह जिहाद’मधून! तथापि, आज ग्रीसमधील माध्यमांनी याबाबत लिहिले, पण भारतातील मुख्य प्रवाहातील माध्यमे असो वा विकसित देशांतील माध्यमे असोत, ते यावर फारसे लिहित, बोलत नाहीत. पण, त्यामुळे ‘लव्ह जिहाद’ची समस्या अस्तित्वातच नाही असे नव्हे.
 
त्याचा सामना संपूर्ण बिगर मुस्लीम करत आहेत. प्रेमाच्या नावाखाली भोळ्या-भाबड्या मुलींना फसवत आहेत. यातले महत्त्वाचे तथ्य म्हणजे, ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकणार्‍या मुली प्रामुख्याने अल्पवयीन असतात. इस्लामी कट्टरपंथीदेखील शाळा-महाविद्यालयांतील अल्पवयीन मुलींनाच हेरुन लक्ष्य करतात. कारण, त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे सोपे जाते. तसेच, शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यास ‘लव्ह जिहाद्यां’कडून अशा मुलींना आपल्या मनाप्रमाणे कृती करण्यास भाग पाडले जाते. त्यांची दिशाभूल केली जाते.
 
मुली ‘लव्ह जिहाद्यां’च्या सापळ्यात अडकण्यात छद्म पुरोगामित्व, धर्मनिरपेक्षताही मोठी भूमिका बजावतात. उदारवादामुळे मुलींना ‘लव्ह जिहादी’ आणि आपल्यातील सांस्कृतिक भेद आणि शैक्षणिक स्तराची सत्यता माहिती नसते वा माहिती करून घेतली जात नाही. म्हणून मग आई-वडिलांचाही विरोध केला जातो. ग्रीसमध्येही असाच प्रकार घडत आहे, निकोलेटाबाबतही तसेच झाले.
 
पाकिस्तानी आणि अफगाणी मुस्लीम तरुणांशी प्रेम करण्याला तिकडे क्रांती मानले जात आहे. भारतातही याच सुत्राने ‘लव्ह जिहादी’ आणि त्यांना पाठीशी घालणारे काम करतात. इकडे मुस्लीम आक्रमकांना विजेते म्हणून दाखवले जाते आणि स्थानिक वा हिंदू नायकांची ओळख खलनायक म्हणून करून दिली जाते. त्यात शैक्षणिक, अकादमीक आणि मनोरंजन क्षेत्रदेखील हिरिरीने भाग घेते. त्यानुसार स्थानिकांना असभ्य ठरवून त्यांना सुधारण्यासाठी मुस्लीम आक्रमक इकडे आळ्याचे सांगितले जाते.
 
त्यातूनच स्थानिक संस्कृतीला नष्ट करणार्‍यांच्या कुकृत्यांना महान ठरवत संपूर्ण स्थानिक संस्कृतीचा संहार करण्याचा प्रयत्न केला जातो. परिणामी, ‘लव्ह जिहाद्यां’च्या व ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणार्‍यांच्या प्रभावाखाली सापडलेली मुलगी आपले संपूर्ण आयुष्य बुरख्यात घालवते वा तिची हत्या केली जाते वा ती आपल्याच संस्कृतीविरोधात उभी राहते. महत्त्वाचे म्हणजे ‘लव्ह जिहाद’मध्ये फसलेल्या मुलीचे सांस्कृतिक आयुष्य बदलणे वा तिची हत्या होणे वा तिने आपल्या संस्कृतीविरोधात उभे राहणे एका व्यक्तीशी संबंधित मुद्दा नसतो, तर संपूर्ण बिगर मुस्लीम पिढीच्या सांस्कृतिक आयुष्याचा, जीवनाचा मुद्दा असतो.
 
त्याचीही अनेक उदाहरणे आहेत. भारत शतकानुशतकांपासून ‘लव्ह जिहाद’च्या या समस्येचा सामना करत आला आहे. आता ग्रीसच्या माध्यमातून जागतिक स्तरावरही ‘लव्ह जिहाद’ची समस्या चर्चिली जायला लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे कदाचित हिंदूंपुढच्या समस्येकडेही लक्ष दिले जाऊ शकते.