शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार उद्या

    दिनांक : 08-Aug-2022
Total Views |
मुंबई : महाराष्ट्रातील Expansion शिंदे-फडणवीस सरकारचा उद्या मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणार आहे. 9 ऑगस्ट रोजी 11 वाजता सकाळी राजभवनवर हा नवीन मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या राज्य सरकारला महिना लोटला तरी अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे राज्याचा कार्यभार सांभाळत आहेत.
 
 

mantrimandal
 
 
 
 
मंत्रिमंडळ विस्ताराला Expansion होणारा उशीर लक्षात घेऊन, विरोधकांकडून शिंदे-फडणवीसांवर टीकाही सुरू झाली होती. अखेर या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदेंनी 39 आमदारांसह शिवसेनेतून बंड केलं आणि भाजपसोबत सरकार स्थापन केलं. हे सरकार स्थापन झाल्यानंतर गेल्या जवळपास महिन्याभरापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हाती राज्याचा कारभार आहे.