मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी येथील जवान विपीन खर्चे यांना वीरमरण

08 Aug 2022 16:52:25
मुक्ताईनगर (जळगाव) : निमखेडी (ता.मुक्‍ताईनगर) येथील रहिवासी असलेले जम्मू-काश्मिरातील उधमपूर येथे (Jalgaon) सैन्य दलात नायब सुभेदार म्हणून कार्यरत विपीन जनार्दन खर्चे यांना वीरगती प्राप्त झाली. निमखेडी (ता.मुक्‍ताईनगर) येथील मूळ रहिवासी विपीन खर्चे हे सध्या भारतीय सैन्यदलात नायब सुभेदार म्हणून कार्यरत होते. ते सेवा बजावत असताना विपीन खर्चे यांच्‍या गाडीचा (Accident) अपघात झाल्‍याने त्‍यांना हौतात्म्य प्राप्त झाले. यामुळे निमखेडी गावात शोककळा पसरली आहे.

bipin 
 
 
 
 
नायब सुभेदार विपीन खर्चे हे जम्मू-काश्मिर येथे सेवा बजावत होते. दरम्‍यान ते उधमपूर येथे सेवेत असताना त्यांचे वाहन दरीत कोसळल्याने त्यांना विरमरण (Soldier Death) प्राप्त झाले आहे. त्‍यांचे पार्थिव गावी आल्‍यानंतर त्‍यांच्‍यावर शासकिय इतमामात अंत्‍यसंस्‍कार केले जाणार आहेत.
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0