'लालपरी'चा नवा अध्याय सुरू; जळगावातून राज्यभर धावणार एसटीची ई-बस

06 Aug 2022 18:53:38
जळगाव : राज्य परिवहन महामंडळात (MSRTC) आता ई-एसटीचा नवा अध्याय सुरू होत आहे. जिल्ह्याच्या एसटी परिवहन विभागातील विविध ११ आगारात सुमारे ८०० च्या वर बसेस प्रवाशांच्या सेवेत धावत आहेत. त्यात आता डिझेलला टाटा-बायबाय करीत १०० नव्या ई-बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी लवकरच दाखल होणार असल्याची माहिती जळगाव एसटी विभाग प्रशासन अधिकार्‍यांनी दिली.
 

Shivai E BUS 
 
जिल्हयात शहरी, तालुकास्तरावर तसेच लहानातील लहान गावात गाव तिथे एसटी, प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रिदवाक्यानुसार दरवाजा, खिडक्यांच्या खडखडाट करीत प्रवाशांना इच्छितस्थळी पोचवणारी ‘लालपरी’ आता डिझेलला बायबाय करीत नव्या स्वरूपात दाखल होणार आहे. एसटी परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागात १०० ई- बसेेस लवकरच दाखल होणार आहेत. जुन्या बसेसच्या इंजीनच्या घरघराटामुळे त्रास अनुभवास येत होता. नव्या बसेस इलेक्ट्रीक चार्जीेगयुक्त असून डिझेल इंधनामुळे धुर, ध्वनी प्रदुषण तसेच व्हायब्रेटमुक्त आरामदायी सुखकर प्रवास सुविधा मिळेल असा दावा महामंडळाकडून केला जात आहे.
 
प्रवाशांना निम आराम बसभाड्यात सुविधा
 
एसटीच्या ७५ व्या वर्धापन दिनी १ जून रोजी पुणे, मुंबई सारख्या महानगरात येथे इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार महामंडळ प्रशासनाने जिल्ह्याच्या व्याप्तीनुसार बसेस देण्याचे धोरण आहे. त्यानुसार जिल्हा परिवहन विभागाकडून ४९ बसेसची मागणी करण्यात आली होती. त्यात वाढ करण्यात करण्यात आली असून १०० ई-बसेस मागणीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. निम आराम बसच्या प्रवासी भाड्यानुसार या ई- बसेससाठी प्रवासी भाडे आकारणी होईल. या माध्यमातून प्रवाशांना आरामदायी, सुखकारक प्रवास सुविधा मिळेल.

भगवान जगनोर, जळगाव एसटी परिवहन विभाग प्रमुख
 
Powered By Sangraha 9.0