चीनच्या (America and China) विरोधानंतरही नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये दाखल झाल्याने ड्रॅगन भडकला आहे. जागतिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणार्या अमेरिकेला सार्या जगात आपले वर्चस्व कायम ठेवायचे आहे तर चीनला आपले साम्राज्य इतर देशांमध्ये प्रस्थापित करायचे आहे. साम्राज्यवादाच्या याच लढाईचा भाग म्हणून तैवानवर चीनने आपला दावा केला आहे. याशिवाय भारत आणि पाकिस्तानच्याही सीमावर्ती भागात साम'ाज्य प्रस्थापित करण्याचे मनसुबे आखत चीनच्या कुरघोड्या सातत्याने सुरूच असतात. जागतिक महासत्तेला उत्तर देण्याचे काम त्याच धर्तीवर चीनने सुरू केले आहे. छोट्या राष्ट्रांवर दबाव आणून त्याने आपल्या बाजूने वळविले किंवा त्यांची आर्थिक कोंडी करून त्यांच्याच भीती निर्माण करणे यासारख्या कारवाया मोठ्या राष्ट्रांकडून सुरू असतात. अमेरिकेला टक्कर देणार्या राष्ट्रांमध्ये चीन म्हणजेच ड्रॅगन हे देखील एक मोठे शक्तिशाली राष्ट्र आहे. त्यामुळे यांच्यात संघर्षाची ठिणगी पडल्यास युद्धाची भीती नाकारता येऊ शकत नाही. (America and China) साम्राज्यवादाच्या या लढाईत मोठे राष्ट्र लहान राष्ट्रांना त्यांच्या संघर्ष काळात मदतीचा हात देतात आणि नंतर त्याच राष्ट्रांवर दबाव टाकत आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न करतात.
आपापले साम्राज्य वाढावे, आपले वर्चस्व अ''या जगावर कायम असावे यासाठी अमेरिका, (America and China) चीन, रशिया यांच्यासारखे राष्ट्र प्रयत्न करतात. त्यांच्या या अस्तित्वाच्या लढाईत सर्वसामान्य जनतेचे मात्र हाल होतात. रशिया-युक्रेन युद्धाची झळ सर्वांनाच बसते आहे. युद्ध हे कोणत्याच राष्ट्रासाठी लाभदायक नाही. तरीसुद्धा साम'ाज्यवादाच्या या लढाईत परराष्ट्र संबंध दूषित होताना दिसू लागले आहेत. चीनच्या विरोधानंतरही नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये पोहोचल्या आहेत. त्यामुळे काल चीनच्या सैन्यांनी तैवानच्या सीमेजवळ लष्करी कारवाया केल्या. युद्ध कधीही पेटू शकते यासाठी अमेरिका व चीन या दोन्ही देशांनी आपल्या सैन्याला सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. अमेरिकेच्या संसदीय अध्यक्ष नॅन्सी पेलोसी या ड्रॅगनच्या धमक्यांना न जुमानता 24 अॅडव्हॉन्स फायटर जेटच्या सुरक्षेत तैवानमध्ये दाखल झाल्या.
पाकिस्तानला काश्मीर आपल्या ताब्यात घ्यायचा आहे तर काश्मीर हा भारताचा स्वर्ग असून त्यांची तसूभरही जागा भारत पाकिस्तानला घेऊ देणार नाही. याच साम्राज्यवादाच्या लढाईत चीनसारखे मोठे राष्ट्र पाकिस्तानला मदत करतात आणि जगातील शांतता धोक्यात आणण्याचा प्रयत्न करतात. (America and China) आंतरराष्ट्रीय पातळीवर देशादेशांमधील सीमावाद सोडविण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही; उलट दोन देशांमधील सीमावादाला आग देऊन त्या आगीच्या भडक्यात आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न स्वत:ला महासत्ता समजणार्या राष्ट्रांकडून केला जातो. रशिया, अमेरिका, चीन यासार'या विकसनसील व बलाढ्य राष्ट्रांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू असून याचे गंभीर परिणाम मात्र निष्पाप लोकांना भोगावे लागत आहेत. अमेरिका-चीन युद्ध पेटल्यास जगातील इतर राष्ट्रांचीदेखील मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे अमेरिका-चीन या दोन्ही राष्ट्रांनी समजूतदारीने वागण्याची गरज आहे.
- 9922999588