रेल्वे तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्या कर्मचाऱ्यासह साथीदारास अटक

    दिनांक : 31-Aug-2022
Total Views |
जळगाव : रेल्वेच्या तिकीटांचा काळाबाजार करणा-या रेल्वे कर्मचाऱ्यासह त्याच्या साथीदारास जळगाव रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने सोमवारी रात्री जामनेर येथूनअटक केली आहे.
 

crime 
 
 
 
चंद्रकांत प्रताप पाटील (37) रा. नगरदेवळा, ता. पाचोरा असे लिपीकाचे तर सिद्धार्थ सुरेश सोनवणे (25) रा. रेल्वे कॉलनी, जामनेर असे संशयित दलालाचे नाव आहे.
 
आरपीएफ पथकाने ताब्यात घेतलेल्या दोघांकडून 68 हजार 535 रुपये किमतीची 14 तिकिटे हस्तगत केली आहेत. तक्रारदार प्रवाशांच्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर भुसावळ आरपीएफ मंडळ सुरक्षा आयुक्त क्षितिज गुरव यांच्या निर्देशनात पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील, उपनिरीक्षक मनोज सोनी, परीक्षित वानखेडे, किरण पाटील, विनोद जेठवे यांच्या पथकाने जामनेर येथून लिपीक चंद्रकांत पाटील व त्याचा साथीदार सिद्धार्थ सोनवणे यास साध्या वेशात सापळा रचून रंगेहाथ अटक केली. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरु आहे.