धक्कादायक ... शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूला लगत रेल्वे ट्रॅकजवळ आढळले दीड महिन्याचे मृत अर्भक !

    दिनांक : 30-Aug-2022
Total Views |
 
जळगाव : जळगाव शहरात नव्याने वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूलाचा खाली मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारात शाल मध्ये गुंडाळलेल्या एक सव्वा ते दीड महिन्याचे पुरुष जातीचे अर्भक हातापायाला काळा दोरा, शाल, औषधी आणि दूध पिण्याची बाटली असे सर्व बालकाजवळ आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी प्रभागाचे नगरसेवक राजेंद्र मराठे यांना दिल्यावर त्यांनी शहर पोलिस ठाण्याच्या पोलिसांना याबाबत कळविण्यात असून ते घटनास्थळी दाखल झाले.

arbhak 
 
 
 
घटनेची माहिती कळताच शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. चिमुकल्याचा मृत्यू कसा झाला, त्याला कुणी फेकले, त्याचे पालक कोण? असे सर्व प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. घटनास्थळी रुग्णवाहिका बोलाविण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. घटनेमुळे समाजात संताप व्यक्त होत आहे.