महिलेची हत्‍या करत कॅरीबॅगमध्‍ये टाकून मृतदेह फेकला

मुक्‍ताईनगर परिसरातील घटना

    दिनांक : 29-Aug-2022
Total Views |
मुक्‍ताईनगर : तालुक्यात एका महिलेची क्रूरपणे हत्या केल्‍याची घटना उघडकीस आली आहे. हत्‍या  केल्‍यानंतर महिलेचा मृतदेह कॅरीबॅगमध्‍ये टाकून पुलाखाली फेकलेला आढळून आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 


hatya1 
 
 
मुक्ताईनगर– बर्‍हाणपूर महामाार्गवरील कुंड गावाजवळील पुलाच्या खालील बाजूस आज सकाळी महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेचा मृतदेह हा जाड प्लॅस्टीकच्या कॅरीबॅग्जमध्ये भरून टाकल्याचे आढळून आले. संबंधीत महिलेची ओळख पटलेली नाही.
 
पोलिसांकडून पंचनामा सुरू
 
पोलिसांना  या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले. पुलाच्या खालील बाजूस असलेला मृतदेह वर काढण्यात येत असून या प्रकरणी पोलिसांकडून पंचनामा सुरू आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात खूनाच्या सातत्याने घटना घडत आहेत. यात जळगाव शहरासह यावल तालुक्यात दोन, चाळीसगावमध्‍ये एक खून झाला आहे. या पाठोपाठ आता मुक्ताईनगर तालुक्यात हत्या झाल्याने परिसर हादरला आहे.