हिजाब प्रकरण: कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालया कडून नोटीस

    दिनांक : 29-Aug-2022
Total Views |
नवी दिल्ली : हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी ५ सप्टेंबरला होणार आहे.
 
 

hijab 
 
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पुढे ढकलल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यां मुख्य न्यायमूर्ती रितू राज अवस्थी यांच्या अध्यक्षतेखालील कर्नाटक उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले होते की कुराणमध्ये मुस्लिम महिलांना हिजाब घालणे बंधनकारक नाही. पीठाने म्हटले होते की, पेहराव हे मुस्लिम महिलांसाठी 'सार्वजनिक ठिकाणी प्रवेश' मिळवण्याचे साधन आहे, 'सामाजिक सुरक्षेचे' उपाय आहे. परंतु इस्लाममध्ये हिजाब घालणे ही धार्मिक सक्ती नाही. उच्च न्यायालयाने कर्नाटकातील हिजाब वादाचा जलद आणि परिणामकारक तपास करण्यासही अनुकूलता दर्शवली होती, ज्याने संशय व्यक्त केला होता की काही संघटना या प्रकरणाचा वापर राज्यात सामाजिक अशांतता आणि विसंगती पसरवण्यासाठी शस्त्र म्हणून करत आहेत.