न्यायमूर्ती यू. यू. लळीत यांनी घेतली भारताचे ४९ वे सरन्यायाधीश पदाची शपथ

    दिनांक : 27-Aug-2022
Total Views |
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
 
 
नवी दिल्ली:  न्यायमूर्ती यू. यू. लळीत अर्थात उदय उमेश लळीत यांनी भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. उपराष्ट्रपती जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक केंद्रीय मंत्री या सोहळ्यात सहभागी झाले होते.
 
 
 
lalit
 
 
भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा काल म्हणजेच, २६ ऑगस्टला सेवानिवृत्त झाले त्यानंतर न्यायमूर्ती उदय लळीत यांनी देशाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.
 
न्यायमूर्ती यू यू ललित यांनी आज देशाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. राष्ट्रपती भवनात हा कार्यक्रम पार पडला. न्यायमूर्ती ललित हे भारताचे ४९ वे सरन्यायाधीश आहेत. उपराष्ट्रपती जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर अनेक केंद्रीय मंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. न्यायमूर्ती ललित यांच्या आधी सरन्यायाधीश म्हणून काम केलेले न्यायमूर्ती एनव्ही रमणा हेही यावेळी उपस्थित होते.
 
'तीन तलाक' (Triple Talaq) प्रथा अवैध ठरवण्यासह अनेक ऐतिहासिक निर्णयांच्या प्रक्रियेत न्या. यू. यू. लळीत यांचा सहभाग आहे. यू. यू. लळीत हे दुसरे सरन्यायाधीश असतील, ज्यांची थेट सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) पीठात पदोन्नती देण्यात आली. त्यांच्या आधी न्या. एस. एम. सीकरी मार्च १९६४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पीठात पदोन्नती मिळालेले पहिले वकील होते. ते जानेवारी १९७१ मध्ये देशाचे १३ वे सरन्यायाधीश बनले होते.