पाकिस्तानात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

    दिनांक : 26-Aug-2022
Total Views |
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये Pakistan अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 937 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर शेजारील देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
 


pak1
 
 
 
 
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मान्सूनच्या संततधार पावसाला मानवतावादी संकट म्हटले आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) संकलित केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, सिंध प्रांतात 14 जूनपासून पूर आणि पावसाशी संबंधित घटनांमुळे सर्वाधिक 306 मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. या वर्षी पाकिस्तानात 241 टक्के जास्त पाऊस झाला आहे. यंदा ऑगस्टमध्ये सरासरी 48 मिमीच्या तुलनेत 166.8 मिमी पाऊस झाला आहे.
 
हवामान बदल मंत्री शेरी रहमान यांनी कबूल केले की संततधार पावसामुळे मदतकार्य करणे कठीण झाले आहे. एनडीएमएमध्ये पंतप्रधानांनी एक वॉर रूमही स्थापन केली आहे. सध्याच्या परिस्थितीची 2010 च्या विनाशकारी पुराशी तुलना करताना, रहमान यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला सांगितले की, गेल्या काही आठवड्यांमध्ये Pakistan पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे 30 दशलक्षाहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत त्याच वेळी, संयुक्त राष्ट्र एजन्सी ऑफिस (OCHA) ने एका अहवालात खुलासा केला आहे की गेल्या 24 तासांत देशभरात 82,000 हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे आणि 150 किमी रस्ते खराब झाले आहेत.