मुंबई : Maharashtra महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची मागील दोन वर्षांत भरती प्रकि‘या काही प्रमाणात मंदावली होती; मात्र आता ज्या प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतिबंध अंतिमरीत्या मंजूर केले आहेत, अशा सुधारित आकृतिबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य पदे 50 टक्के भरण्यात येणार आहेत. राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील 100 टक्के पदभरती करणार तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता 50 टक्केपदे भरण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली. शासनाच्या 29 प्रमुख विभागांमध्ये 2 लाख 193 जागा रिक्त असल्याबाबतची लक्षवेधी विधानपरिषदेत सादर करण्यात आली. या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते. देसाई म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षात 75 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे.
राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील 100 टक्के पदभरती करणार आहोत. भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-ब (अराजपत्रित), गट- क व गट- ड संवर्गातील नामनिर्देशनच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्याबाबत जिल्हा निवड समिती, प्रादेशिक निवड समिती व राज्यस्तरीय निवड समिती स्थापन करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगास 18 ऑगस्ट 2022 पर्यंत Maharashtra विविध पदांच्या भरतीकरिता प्राप्त झालेल्या गट-अ, गट-ब व गट-क मधील एकूण 11026 पदांच्या मागणीपत्राच्या अनुषंगाने राज्य लोकसेवा आयोगाकडून आतापर्यंत 10 हजार 20 पदांकरिता जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. आतापर्यंत आयोगाकडून प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने पार पाडण्यात आलेल्या परीक्षा प्रकि‘येअंती 3 हजार पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. उर्वरित पदांकरिता परीक्षा प्रकि‘या आयोगाकडून राबविण्यात येत असल्याचेही शंभुराज देसाई यांनी म्हणाले.