धक्कादायक... तरूणीची बनावट इंन्स्टाग्राम खात्यावरून बदनामी

    दिनांक : 20-Aug-2022
Total Views |
जळगाव सायबर पोलीसात गुन्हा दाखल
 
जळगाव : शहरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीच्या नावाने बनावट अकाउंट तयार करून तिची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

cyber crime 
 
 
 
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील हुडको कॉलनीत १९ वर्षीय तरूणी ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. दरम्यान १७ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट दरम्यान तिच्या नावाने बनावट अकाउंट इंस्टाग्रामवर बनवून तरुणीची बदनामी केली. दरम्यान ही गंभीर बाब तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने नातेवाईकांना सांगितले. व नातेवाईकांच्या मदतीने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवार १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहे.