तिरंग्याच्या निर्मितीसाठी ज्यांचा सदैव ऋणी आहे हा देश...

02 Aug 2022 14:51:40


Tiranga11

 
 
 
तिरंगा - भारताचा राष्ट्रध्वज तीन रंगांनी सजलेला हा तिरंगा केवळ एक झेंडा नाही तर तो भारत देशाची आन-बान आणि शान आहे. हा तिरंगा म्हणजे १३० कोटींहून अधिक भारतीयांमध्ये असलेले साहस, शौर्य, अभिमान, आकांक्षा आणि पवित्रतेचे प्रतीक देखील आहे. मात्र, सर्वात आधीच्या काळात आपल्या ध्वजाचे रूप असे नव्हते. वेळोवेळी यात अनेक बदल करण्यात आले. आज आपला तिरंगा ज्या स्वरुपात आहे त्याचे जनक आहेत पिंगळी वेंकैय्या. २ ऑगस्ट १८७६ रोजी आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्याजवळच्या एका गावात जन्मलेल्या पिंगळी वेंकैय्या यांच्याकडे खुद्द महात्मा गांधीजींनीच राष्ट्रध्वज तयार करण्याचे काम दिले होते. त्यांनी १९२१ मध्ये राष्ट्रध्वज तयार केला. १९३१ साली या ध्वजाच्या स्वरुपात काही सुधारणा करण्यात आल्या. त्यानंतर २२ जुलै १९४७ रोजी आपला राष्ट्रध्वज मूळ रुपात स्वीकारण्यात आला.
 
 
Tiranga12
 

 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0