मोठी बातमी... ड्रोन हल्ल्यात जवाहिरीचा मृत्यू, भारतात दहशतवादी हल्ल्याची शक्यता ! गुप्तचर खात्याकडून अलर्ट

    दिनांक : 02-Aug-2022
Total Views |
नवी दिल्ली- अल- जवाहिरीच्या मृत्यूनंतर भारतात दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अल-कायदाशी संबंधित संघटनांकडून हल्ला होऊ शकतो. त्यामुळे अल-जवाहिरीच्या मृत्यूनंतर गुप्तचर खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. साधारणपणे जेव्हा-जेव्हा अल-कायदाचा नवीन उत्तराधिकारी आपली जागा सांभळतो. त्यानंतर विविध ठिकाणी हल्ले झाल्याचे याआधी जगभरात घडवून आणल्याचे दिसून आले.
 

crpf1 
 
 
 
२०११ साली ओसामा बिन लादेन याची हत्या करण्यात आली. त्यानंतरही दूतवासावर हल्ला करणं, विविध शहरांवर हल्ला करण्याचे प्रयत्न अल-कायदाकडून करण्यात आले. अल-जवाहिरीच्या मृत्यूनंतरही अशाच प्रकारचे हल्ले होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच अल-कायदा लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या सारख्या दहशतवादी संघटनेला मदत करत असते. त्यामुळे या संघटनेचे जे स्लिपरसेल्स आहेत, त्यांना सक्रिय करण्याचे आदेश अल-कायदा देऊ शकतं, अशी माहिती समोर येत आहे.
 
दरम्यान, २०११मध्ये ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर जवाहिरीने अल-कायदाला आपल्या ताब्यात घेतले. तो आणि लादेन हे अमेरिकेवरील ९/११ च्या हल्ल्याचे सूत्रधार होते. जवाहिरी हा अमेरिकेच्या 'मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट'पैकी एक होता. तोच दहशतवादी कारवायांना पुढे नेत होता. हा दहशतवादी नेता आता राहिला नाही, असे जो बायडेन यांनी व्हाईट हाऊसच्या सायंकाळच्या भाषणात जाहीर केले.
 
जो बायडन यांनी, आता न्याय मिळाला असल्याची भावना व्यक्त केली. कितीही उशीर लागला, तुम्ही कुठेही लपलात तरी, आमच्या लोकांसाठी धोका असाल तर अमेरिका तुम्हाला शोधून बाहेर काढणार, असा इशारा यानिमित्ताने बायडन यांनी दिला आहे. या हल्ल्यादरम्यान इतर कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती बायडन यांनी दिली आहे.